Dhule Heavy Rain
Dhule Heavy RainSaam tv

Dhule: रात्रीच्‍या मुसळधार पावसाने मक्का जमीनदोस्त

रात्रीच्‍या मुसळधार पावसाने मक्का जमीन दोस्त
Published on

धुळे : धुळे तालुक्यात कापडणे शिवारात रात्री झालेल्या पावसामुळे मक्का पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी (Farmer) हतबल झाला आहे. (Dhule News Heavy Rain)

गेल्या काही दिवसांपासून (Dhule News) अधून- मधून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. काल देखील रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कापडणे शिवारात शेतकऱ्यांनी जिवापाड जपलेले मक्याचे पीक पूर्णतः जमीन दोस्त झाले आहे. या नुकसानग्रस्त मका पिकाची जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे यांनी पाहणी केली असून संबंधित कृषी अधिकाऱ्यांना शेताच्या बांधावरून फोनवर संपर्क साधत या पीक नुकसानीची तात्काळ पाहणी करून पंचानामे करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com