Dhule News: विष प्राशन करून आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न; संपादीत जमिन मोबदल्‍याची शेतकऱ्यांना दहा वर्षांपासून प्रतिक्षा

विष प्राशन करून आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न; संपादीत जमिन मोबदल्‍याची शेतकऱ्यांना दहा वर्षांपासून प्रतिक्षा
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : औष्णिक विद्युत प्रकल्प उभारणीसाठी शेतकऱ्यांच्‍या जमिनी भुसंपादीत केल्‍या होत्‍या. परंतु, त्‍याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. यामुळे शिंदखेडा (Shindkheda) तालुक्यातील वितरण येथील शेतकऱ्यांनी (Farmer) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. (Breaking Marathi News)

Dhule News
Wardha News: धक्कादायक वास्तव..अकरा महिन्यांत १३८ शेतकऱ्यांची आत्महत्या

तब्बल दहा वर्षांपूर्वी संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी केला आहे. त्याचबरोबर प्रशासनाने (Dhule News) जमीन संपादित करताना औष्णिक विद्युत प्रकल्प होणार असल्याचे सांगून वारसदारांना नोकरीचे आमिष दिले होते. परंतु प्रशासनाने औष्णिक विद्युत प्रकल्प न उभारता सौर प्रकल्पात वर्ग केल्याने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेने अनर्थ टळला

गेल्या काही वर्षांपूर्वी याच प्रकल्पासंदर्भात धर्मा पाटील या वृद्ध शेतकऱ्याने मंत्रालयात विष प्राशन करून आत्‍महत्‍या केली होती. तरी देखील शेतकऱ्याला मोबदला मिळालेला नाही. यामुळेच पुन्‍हा धुळे जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करून केला आक्रोश व्यक्त केला. विष प्राशस करून आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केला. मात्र पोलिस प्रशासनाच्‍या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com