Cotton Price : घरात साठवून ठेवलेला कापूस काळवंडतोय; भाव वाढ होत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत

Dhule news : कापसाला ७ हजार पेक्षा जास्तीचा भाव अद्यापही मिळत नसल्यामुळे कापूस घरातच साठवून ठेवला भाव वाढ होत नसल्याने आणखी किती दिवस साठवून ठेवायचा? असा प्रश्न कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर उपस्थित
Cotton Price
Cotton PriceSaam tv
Published On

धुळे : कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून भाववाढीच्या अपेक्षेने कापूस घरातच साठवून ठेवण्यावर भर दिला आहे. मात्र कापूस साठवणूक करण्यास तीन महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी उलटला असून आता या साठवून ठेवलेल्या कापसाची गुणवत्ता खालावू लागली आहे. घरात असलेला कापूस काळवंडत असून त्याच्या वजनात देखील घट होत आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आता चिंतेत सापडला आहे. 

धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन घेतले जात असते. यंदा देखील कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली असून शेतकऱ्यांनी कापूस काढणी केली आहे. मात्र यंदा कापसाला ७ हजार पेक्षा जास्तीचा भाव अद्यापही मिळत नसल्यामुळे कापूस घरातच साठवून ठेवला आहे. मात्र भाव वाढ होत नसल्याने आणखी किती दिवस कापूस साठवून ठेवायचा? असा प्रश्न कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर उपस्थित राहिला आहे. 

Cotton Price
Saam Impact : दारू पिऊन रुग्णावर उपचार; डॉक्टरची तडकाफडकी बदली, सामच्या बातमीचा दणका!

तीन महिन्याहून अधिकचा काळ लोटला  
साधारण सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून कापूस काढणीला सुरवात झाली आहे. अर्थात जवळपास तीन महिन्यांपासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून काढलेला कापूस भाववाढीच्या आशेने आपल्या घरातच साठवून ठेवला आहे. जवळपास तीन महिने उलटून देखील अद्यापही कापसाला भाव वाढ मिळत नसल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. तर दुसरीकडे कापसाच्या वजनात देखील घट होत आहे. 

Cotton Price
Sewagram Police Raid : गेम पार्लरवर पोलिसांचा छापा; दहा जणांवर गुन्हा दाखल करत घेतले ताब्यात

जालन्यात सीसीआयकडून कापुस खरेदी
जालना
: जालन्यात सीसीआयच्या वतीने कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. सीसीआयच्यावतीने जालन्यातील पिरकल्याण येथील जालना सहकारी जिनिंग येथे कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या हस्ते सीसीआय केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या सीसीआय केंद्रावर कापसाला ७ हजार ४०० रुपये उच्चांकी दर मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com