Sewagram Police Raid : गेम पार्लरवर पोलिसांचा छापा; दहा जणांवर गुन्हा दाखल करत घेतले ताब्यात

Wardha News : पोलिसांकडून सापळा रचून छापा टाकण्यात आला. या छाप्यात विनापास परवाना ऑनलाइन गेम पार्लर संगणकाच्या माध्यमातून सिंगल टायमर नावाचा लॉटरी व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले
Wardha News
Wardha NewsSaam tv
Published On

चेतन व्यास 
वर्धा
: वर्ध्याच्या सेवाग्राममध्ये ऑनलाईन गेम पार्लर सुरु होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्याठिकाणी सेवाग्राम पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत दहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध विनापरवाना ऑनलाइन गेम पार्लर सुरू केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परीविक्षाधीन पोलिस अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी आणखी पुढील तपास सुरु आहे. 

वर्ध्याच्या सेवाग्राम पोलिसांना परिसरात विनापरवाना ऑनलाइन गेम पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिसांकडून सापळा रचून छापा टाकण्यात आला. या छाप्यात विनापास परवाना ऑनलाइन गेम पार्लर संगणकाच्या माध्यमातून सिंगल टायमर नावाचा लॉटरी व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून संगणक, टेबल, खुर्ची तसेच आरोपीची अंगझडती घेत एकूण ५३ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

Wardha News
Tuljapur News : शेतकऱ्याला मारहाण प्रकरण; अखेर पवनचक्की कंपनीसह १३ जणांवर गुन्हा दाखल

मुद्देमाल जप्त करत दहा जणांवर कारवाई केली आहे. यात नीलेश सुधाकर धाकतोड (वय २८), सुनील ओंकार वैद्य (वय ४५), निखिल राजेंद्र काकडे (वय ३२), प्रज्वल राजू फुलझेले (वय २७), प्रज्वल भाष्कर थूल (वय २७), श्रीधर ज्ञानेश्वर उराडे (वय ३७), दिनेश भाऊराव भुरे (वय ३१), विकेश राजेंद्र काकडे (वय ३३), संदीप विनोद चकोले (वय २२) आणि संदीप सुरेशराव भुरे (वय ३७) यांना ताब्यात घेतले आहे. 

Wardha News
Saam Impact : दारू पिऊन रुग्णावर उपचार; डॉक्टरची तडकाफडकी बदली, सामच्या बातमीचा दणका!

दोन राज्यातील सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या
चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करीत असताना वर्धा शहर पोलिसांच्या डीबी पथकाने एका आरोपीला अटक केली. त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने जुन्या चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. या चोरट्यांनी दोन राज्यांत हात साफ केल्याचे उघडकीस आले आहे. शेख मोबीन शेख इस्त्रायईल (वय २६, रा. बेडकीपुरा, जि. यवतमाळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी शेख मोबीन शेख इस्त्रायईल याला अटक करुन त्यांच्याकडून दुचाकी जप्त केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com