Fraud Case: शेतकऱ्याची ३३ लाखांत फसवणूक; मजूर पुरवण्यातून प्रकार

शेतकऱ्याची ३३ लाखांत फसवणूक; मजूर पुरवण्यातून प्रकार
Dhule News Fraud
Dhule News FraudSaam tv
Published On

शिरपूर (धुळे) : ऊस तोडणीसाठी मजूर पुरवण्याचे आश्वासन देऊन शेतकऱ्याची ३३ लाख रुपयांत फसवणूक केल्याच्या संशयावरून तिघांविरोधात शहर पोलिसांत (Police) गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणुकीचा (Fraud) प्रकार १३ एप्रिल ते तीन ऑक्टोबरदरम्यान घडला. (Tajya Batmya)

Dhule News Fraud
Jalgaon: दिवाळीच्‍या दिवशीच कुटुंबावर दुःखाचा अंधार; महावितरणच्या तंत्रज्ञासह एकाचा शॉक लागून मृत्यू

सांगली (Sangli) जिल्‍ह्यातील बावची येथील भीमराव केरू पवार (वय ५०) असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे (Farmer) नाव आहे. त्यांना ऊस तोडणीसाठी मजुरांची गरज होती. शिरपूर (Shirpur) तालुक्यात ऊस तोडणी मजूर असल्याची माहिती मिळाल्याने एप्रिल महिन्यात ते शिरपूरला आले. त्यांना सुरसिंह दरेसिंह भिल, चंद्रसिंह दरेसिंह भिल (दोघे रा.नटवाडे ता.शिरपूर) व विजय छगन भिल (रा.वरझडी ता.शिरपूर) भेटले. आपल्याकडे मजुरांच्या टोळ्या असल्याची माहिती देऊन संशयितांनी त्यांचा विश्वास संपादन केला.

आगाऊ रक्‍कम घेतली

मजुरांच्या टोळ्यांना आगाऊ रक्कम द्यावी लागेल, असे सांगितले. त्यामुळे नटवाडे गावात, शहरातील सुदर्शन हॉटेलमध्ये पवार यांनी त्यांना रोख रक्कम दिली. आरटीजीएस, फोन पे अशा ऑनलाइन माध्यमातून संशयितांच्या खात्यातही त्यांनी पैसे पाठवले. तीन ऑक्टोबरअखेर संशयितांना एकूण ३३ लाख ५० हजार रुपये भीमराव पवार यांनी दिले. मात्र संशयितांनी मजूर पाठवले नाहीत. त्यामुळे पवार यांनी पैसे परत देण्याची मागणी केली. पैसे परत करण्यास संशयितांनी टाळाटाळ केली. त्यांचा फसवणुकीचा उद्देश स्पष्ट झाल्याने पवार यांनी शहर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक निरीक्षक गणेश फड तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com