Nilanga : मांजरा नदीलगतच्या शेतीचे नुकसान, चिखलात असलेली पिके आता पाण्यातच

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरूवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे जिकडे- तिकडे पाणीच पाणी झाले आहे
Nilanga : मांजरा नदीलगतच्या शेतीचे नुकसान, चिखलात असलेली पिके आता पाण्यातच
Nilanga : मांजरा नदीलगतच्या शेतीचे नुकसान, चिखलात असलेली पिके आता पाण्यातचदीपक क्षीरसागर
Published On

लातूर : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरूवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे जिकडे- तिकडे पाणीच पाणी झाले आहे. मांजरा धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आल्याने शनिवारी मांजरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाण्याच्या अतिप्रवाहामुळे पाणी नदीच्या पात्राबाहेर पडले, असून यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले आहे. शिवाय जमिनीही खरडून गेल्या असून तालुका प्रशासनाने नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मागील कांही दिवसापासून शहरासह तालुक्यात सर्वदूर जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. शिवाय या पावसामुळे तालुक्यातील लघू व मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाचे १२ दरवाजे उघण्यात आल्याने मांजरा नदीपात्राच्या बाहेर पाणी पडले आहे. मांजरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

हे देखील पहा-

नदीपात्राच्या बाहेर पाणी पडल्याने नदीकाठच्या शेतातील सोयाबीन, तूर, ऊस, या पीकाचे नुकसान झाले आहे. पिके पाण्यात वाहून गेली आहेत. तर कांही शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजी या पाण्यामध्ये वाहून गेल्या असून या पाण्याचा फटका निलंगा तालुक्यातील शेंद, निटूर, ढोबळेवाडी, बसपूर, शिरोळ वांजरवाडा, गिरकचाळ, होसूर, नदीवाडी, हंचनाळ यासह आदी गावाना बसला आहे.

शिवाय मांजरा नदीला आलेल्या पूराचा फटका निलंगा, शिरूरअनंतपाळ व देवणी या तालुक्यातील गावाना सर्वाधिक बसला आहे. कांही शेतकऱ्यांचे गोठ्यातील औजारे देखील वाहून गेली आहेत. पाण्याच्या अतिप्रवाहामुळे ऊसामध्ये पाणी जावून आडवा पडला आहे. शिवाय या पाण्यामुळे गिरकचाळ येथील कोल्हापूरी पध्दतीचा बंधारा पाण्याखाली गेला आहे. रस्ता बंद झाला आहे. तर बसपूर- बाकली येथील पुलावरून पाणी पडल्याने शिरूर अनंतपाळ तालुक्याला जाणारा मार्ग बंद झाला आहे.

Nilanga : मांजरा नदीलगतच्या शेतीचे नुकसान, चिखलात असलेली पिके आता पाण्यातच
Chandrapur; ड्रॅगन फ्रुट शेतीचा प्रयोग यशस्वी...

तर माकणी ता. लोहारा येथील धरण भरण्याच्या मार्गावर असून, तेरणा नदीपात्रात कोणत्याही वेळी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहीती उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग क्रमांक ३ लातूर यांनी दिला आहे. २ दिवसापूर्वीच तालुका प्रशासनाने मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. नदीपात्राच्या पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांनी व गावांना सतर्क रहावे.

याबाबत पोलिसपाटी, तलाठी यांना सूचना देण्यात आल्याची माहिती निलंगा येथील तहसीलदार गणेश जाधव यांनी दिली. तालुक्यातील निलंगा, आंबुलगा, औरादशहाजानी, निटूर, पानचिंचोली, कासारसिरसी या महसूल मंडळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. असाच उर्वरीत पुढील दिवसात पाऊस पडत राहिल्यास रब्बी हंगामाला हा पाऊस पोषक मानला जात आहे. मात्र, सुरवातीच्या काळात पेरणी झालेल्या खरिप हंगामातील सोयाबीन पीक कांही भागात काढणीला आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com