Raigad : "कृषी विभागाने" केलेला रंगीत भात लागवड प्रयोग जिल्ह्यात यशस्वी

लाल, तांबडा, काळा तांदूळ उत्पादनामुळे शेतकऱ्यांना फायदा
Raigad : "कृषी विभागाने" केलेला रंगीत भात लागवड प्रयोग जिल्ह्यात यशस्वी
Raigad : "कृषी विभागाने" केलेला रंगीत भात लागवड प्रयोग जिल्ह्यात यशस्वी राजेश भोस्तेकर
Published On

राजेश भोस्तेकर

रायगड : जिल्हा कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी यावर्षी पांढऱ्या तांदळासह बहुगुणी कलरफुल तांदळाची (Rice) भातशेती लागवड प्रायोगिक तत्वावर योजना राबवली होती. यामध्ये लाल, काळा, तांबडा या रंगाच्या तांदळाची भात लागवड जिल्ह्यातील (district) विविध भागातील १ हजार शेतकऱ्यांनी (farmers) १९० हेक्टरवर शेतजमिनीवर केली होती. जिल्हा कृषी विभागाच्या या योजनेचा शेतकऱ्यांना चांगलाच लाभ झाला आहे.

प्रायोगिक तत्वावर केलेला हा कलरफुल (Colorful) भात शेती प्रयोग फलदायी ठरला असल्याचे यावरून दिसत आहे. कृषी विभागाच्या (Agriculture Department) या यशस्वी प्रयोगामुळे पुढील काळात कलरफुल भात शेती लागवड क्षेत्र वाढविण्याचा संकल्प कृषी विभागाने केला आहे. रायगड (Raigad) जिल्हा हा एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखला जात होता. रायगडची ही ओळख आता पुसली गेली आहे. वाढते औद्योगिकीकरण (Industrialization), महामार्ग, नैसर्गिक आपत्ती यामुळे हळूहळू जिल्ह्यातील शेती क्षेत्र नष्ट होत चाले आहे.

हे देखील पहा-

त्याचबरोबर वाढलेले खर्च, मजुरी यामुळेही शेतकरी शेती करण्यास पुढाकार घेत नाहीत. मात्र असे असले, तरी आजही अनेक शेतकरी शेतात विविध प्रयोग करून पीक घेऊन पारंपरिक शेती व्यवसाय (Business) टिकवून आहेत. जिल्ह्यात पुन्हा भाताचे कोठार म्हणून ओळख व्हावी यासाठी जिल्हा कृषी विभागाने पावले उचली आहेत. शेतकऱ्यांना भाताच्या नव्या जाती विकसित करून त्यापासून आर्थिक उत्पन्न वाढ व्हावी यासाठी जिल्हा कृषी विभागाने लाल, तांबडा, काळा तांदूळ लागवड करण्याची योजना आखण्यात आली होती.

लाल, काळ्या आणि जांभळ्या रंगाच्या या भातात प्रथिने आणि कर्बोदकांचे प्रमाण सामान्य भाताच्या तुलनेत अधिक आहे. हा भात मधुमेह आणि इतर आजारातील रुग्णांसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या प्रकारच्या भाताला मागणी वाढली आहे. काळ्या भाताला ४०० रूपये किलो एवढा भाव मिळतो. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी देखील या भातची लागवड करावी यासाठी कृषी विभागाने प्रयत्न केले होते.

Raigad : "कृषी विभागाने" केलेला रंगीत भात लागवड प्रयोग जिल्ह्यात यशस्वी
धक्कादायक! तामिळनाडूत एकाचवेळी आढळले 33 नवीन ओमिक्रॉन रुग्ण

छत्तीसगड राज्यातून आणि ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथून ३४०० किलो काळ्या रंगाच्या तसेच लाल रंगाच्या ३२०० किलो भाताची बियाणे मागविण्यात आली होती. कर्जत येथील सगूणा बागेतून २०० किलो जांभळ्या रंगाच्या भाताची बियाणे मागविण्यात आली होती. ती जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील निवडक एक हजार शेतकर्‍यांना मोफत देण्यात आली होती. १९० हेक्टरवर त्याची लागवड केली होती. जिल्ह्यात पावसामुळे यावेळी शेतीला फटका बसला असून काळा तांदूळ बियाणे हे हळवा जातीचे असल्याने त्याला थोडा फटका बसला आहे.

लाल आणि तांबडा तांदूळ हा उत्तम प्रतीचा असून त्याचे उत्पादन ही चांगले मिळाले आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी मागे सरासरी २० क्विंटल उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे भविष्यात रायगडातील शेतकरी हा या कलरफुल भात लागवडी करून आपली उत्पादकता वाढवून आर्थिक स्तर उंचावण्यास समर्थ होणार हे नक्की आहे त्यामुळे भविष्यात पुन्हा एकदा रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून आपली ओळख निर्माण करेल यात काही शंका नाही.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com