मावळ - सध्या मावळात उन्हाचा पारा वाढत असल्याने नागरिकांचा थंड पेय आणि रसाळ फळे खाण्यासाठी ओघ वाढू लागला आहे. उन्हाळ्यात रसाळ फळे म्हणजेच कलिंगड, आंबे, खरबूज अशी शरीराला थंडावा देणारी फळे येत असतात. वर्षातून एकदाच ही फळे मिळत असल्याने या फळांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. मावळ मध्ये देखील आता शेतकरी कलिंगडची (Watermelon) शेती करू लागले आहेत आणि ती देखील सेंद्रिय पद्धतीने.
हे देखील पाहा -
मावळ मधील प्रगतीशील शेतकरी नितीन गायकवाड यांनी सुमारे सव्वा एकर मध्ये कलिंगडाची शेती केली आहे. विशेष म्हणजे या शेतीत ते अंतर पीकही घेत आहे. कलिंगड आणि मिरची अशी दोन्ही पीक गायकवाड यांनी एकत्र घेऊन एक वेगळाच प्रयोग आपल्या शेतात केला आहे. त्याचप्रमाणे कलिंगडाची शेती ही सेंद्रिय पद्धतीने त्यांनी पिकवली आहे. त्यात कोणत्याच प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर केला गेला नाही. त्यामुळे कलिंगडाची गोडी नैसर्गिक आहे.
त्यातच ही शेती सेंद्रिय पद्धतीने कलिंगडे पिकवल्यामुळे बाजारात विक्रीसाठी न जाता थेट ग्राहकच शेतात बांधावर ही कलिंगडे घेण्यासाठी येतात. सव्वा एकर शेतात कलिंगड आणि मिरची यांना दोन लाख रुपये खर्च येतो आणि सात ते आठ लाख रुपये यात त्यांना निव्वळ नफा होणार आहे.दरम्यान आय टी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी तळेगाव कामशेत आणि आजूबाजूच्या शहरातुन आलेले ग्राहक थेट शेतातच ताज्या कलिंगडाचा आस्वाद घेताना पहायला मिळतात.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.