सेंद्रिय उत्पादनांच्या मागणीत वाढ; पण शेतकरी अनुत्साही

उत्तर भारतात एचएयू याठिकाणी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी एका उत्कृष्ट केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
सेंद्रिय उत्पादनांच्या मागणीत वाढ; पण शेतकरी अनुत्साही
सेंद्रिय उत्पादनांच्या मागणीत वाढ; पण शेतकरी अनुत्साही saam tv
Published On

सेंद्रिय शेतीउत्पादनांकडे (Organic farming) सर्वसामान्यांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु तरीही अद्याप शेतकरी (Farmers) वर्गात सेंद्रिय शेतीबाबत जागरूक नसल्याचे दिसून येत आहे. म्हणून शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीसाठी जनजागृती करून त्यांना त्यासाठी अल्पभुधारक शेतकऱ्यांनाही प्रवृत्त केले पाहिजे, असे मत चौधरी चरणसिंग हरियाणा कृषी विद्यापीठ (HAU) चे कुलगुरू प्रोफेसर बी.आर. कांबोज (Professor B.R. Kamboj) यांनी व्यक्त केले आहे. कुलगुरू, दीन दयाल उपाध्याय, विद्यापीठाच्या सेंदोर फॉर एक्सलन्स इन इन सेंद्रीय शेतीत वैज्ञानिकांच्या आढावा बैठकीत त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. (Demand for organic produce has increased, but farmers are not enthusiastic)

सेंद्रिय उत्पादनांच्या मागणीत वाढ; पण शेतकरी अनुत्साही
दिलासादायक! चौथ्या तिमाहीमध्ये देशातील कारखान्यांचं उत्पादन वाढलं

सेंद्रिय उत्पादनांची गुणवत्ता राखण्यावर भर दिला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी सुलभ अशा संशोधन कार्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. यासह प्रत्येक शेतकर्‍याला या संशोधनाचा वापर आपल्या शेतात करता आला पाहिजे, असेही यावेळी प्रोफेसर बी.आर. कांबोज यांनी म्हटले आहे. एचएयू उत्तर भारतात स्वतःच्या हक्काचे एक अद्वितीय विद्यापीठ आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी याठिकाणी एका उत्कृष्ट केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. म्हणूनच या केंद्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रेरित करणे आणि जागरूक करणे हे संशोधकांचे कर्तव्य आहे.

आपल्या संशोधनात सर्व विषयांचा समावेश असेल आणि या संशोधनाचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना उपयोग होईल. हे शेतीविषयक संशोधन सर्व शेतकरी आणि ग्राहकांपर्यंत पोहचेल. कृषी संशोधनाशी संबंधित बाबींचा तुकड्यांऐवजी संपूर्ण पॅकेजेसमध्ये शोध घेतला जावा. यात उत्पादन, गुणवत्ता आणि प्रक्रियांचा समावेश असावा. असेही त्यांनी सांगितले.

सहा पिकांवर मूल्य साखळी अभ्यास

हरियाणा सरकारने राज्यातील किन्नू, टोमॅटो, बटाटा, स्ट्रॉबेरी,शिमला मिर्ची आणि आले या सहा महत्त्वाच्या पिकांवर व्हॅल्यू चेन अभ्यास केला आहे. अभ्यासानुसार उत्पादन, कापणी, काढणीनंतरचे विपणन टप्प्यात काही फरक आढळून आले. हा अभ्यास करण्यासाठी, मेसर्स अर्न्स्ट अँड यंग एलएलपी, लघु शेतकरी कृषी व्यवसाय महासंघ हरियाणा (एसएफएसीएच) आणि फलोत्पादन विभाग यांचा समावेश आहे. याच प्रत्येक टप्प्यात आढळलेल्या या फरकांची पूर्तता करून उत्पादनाच्या गुणवत्ता व्यवस्थापन आणि विपणनासाठी शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) सहकार्य करीत आहेत.

कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. सुमीता मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली आहे. S Fach च्या सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. ते म्हणाले की, आधुनिक किरकोळ विक्रेते आणि प्रक्रिया उद्योगांशी एफपीओचा बाजार संबंध एफपीओच्या उत्पन्नात वाढ झाली असल्याची माहिती डॉ. सुमीता मिश्रा यांनी दिली आहे.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com