दिलासादायक! चौथ्या तिमाहीमध्ये देशातील कारखान्यांचं उत्पादन वाढलं

कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची (Indian Economy) गती मंदावली असताना आता एक दिलासादायक आणि उत्साहवर्धक बातमी आहे.
दिलासादायक! चौथ्या तिमाहीमध्ये देशातील कारखान्यांचं उत्पादन वाढलं
दिलासादायक! चौथ्या तिमाहीमध्ये देशातील कारखान्यांचं उत्पादन वाढलंSaam Tv
Published On

औरंगाबाद: कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची (Indian Economy) गती मंदावली असताना आता एक दिलासादायक आणि उत्साहवर्धक बातमी आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीमध्ये देशातील विविध कारखान्यांमध्ये वस्तूचे उत्पादन वाढलं आहे. शिवाय कंपन्यांच्या वार्षिक विक्रीत ३१ टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचं रिझर्व बँकेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीवरून समोर आलं आहे. त्यामुळे कोरोनाचे (Coronavirus) निर्बंध हळूहळू सैल झाल्यानं अर्थचक्राला गती मिळत आहे.

कोरोनामुळे देशात उत्पादन वाढले; मात्र उत्पन्न घटलंय, अशी स्थिती आहे. तरीही कोरोनाकाळात बंद पडलेल्या अर्थचक्राला हळूहळू गती मिळत आहे. उत्पादनातील वाढ उत्साहवर्धक असली तरीही आर्थिक विकासदर मागे पडला आहे. जानेवारी-मार्च २०२१ या तिमाहीत मात्र जीडीपी १.६ टक्के ने वाढला आहे. हा कालावधी पहिल्या कोरोना लाटेनंतर काही ठिकाणचे निर्बंध आणि लॉकडाऊन हटवून हळूहळू अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येतानाचा आहे.

दिलासादायक! चौथ्या तिमाहीमध्ये देशातील कारखान्यांचं उत्पादन वाढलं
अखेर! महाराष्ट्रात धावणार हायस्पीड बुलेट ट्रेन बुलढाण्यात झाले प्रेझेंन्टेशन

मात्र, दुसऱ्या लाटेनंतरची स्थिती कशी असेल हे पुढच्या आर्थिक वर्षातील वित्तीय निकालावर स्पष्ट होईल. कोरोनामुळे मागील आर्थिक वर्षातील जानेवारी ते मार्च २०२१ या चौथ्या तिमाहीचा सूचिबद्ध कंपन्यांचा वित्तीय निकाल सादर करण्याची मुदत सेबीने वाढवली होती. त्यानंतर देशातील दोन लाख ६ हजार ८१ बिगर सरकारी आणि बिगर वित्तीय सूचीबद्ध कंपन्यांनी सादर केलेल्या तिमाही कामगिरीतून उत्साहवर्धक आकडेवारी हाती आली आहे. १ हजार ६३३ वस्तू उत्पादन कंपन्यांची विक्री ३१ टक्क्यांनी वाढली आहे. त्याअगोदरच्या तिमाहीमध्ये ती वाढ ७.४ टक्के इतकी होती. विक्रीतील वाढही अधिक असल्याचं दिसून आल्याचे रिझर्व बँकेने जाहीर केले आहे.

कोरोनामुळे २०२०-२१ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था २३.९ टक्क्यांनी घसरली. ही घसरण गेल्या चाळीस वर्षांतील सर्वांत मोठी मोठी होती. अर्थव्यवस्था ज्या घटकांवर अवलंबुन आहे, त्यातील शेती वगळता सर्वच घटकांची पीछेहाट झाली होती. केवळ कृषी क्षेत्राच्या विकास दरात ३.४ टक्के वाढ झाली होती. नोव्हेंबर-डिसेंबरपासून देशातील काही भागात निर्बंध हटवले गेले, लॉकडाऊन बाजूला केला गेल्यानं जानेवारी ते मार्च २०२१ या चौथ्या तिमाहीत उत्साह दिसून आला. त्यावरूनच वस्तूंच्या उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले. वस्तू उत्पादन क्षेत्राच्या तुलनेत आयटी क्षेत्रातील वाढ ही ६.४ टक्के राहिली आहे. मात्र, विकासदर आणि उत्पन्न मात्र, फारसे वाढू शकले नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

दिलासादायक! चौथ्या तिमाहीमध्ये देशातील कारखान्यांचं उत्पादन वाढलं
अफगाणिस्तानच्या उपराष्ट्रपतींच्या 'त्या' कृत्याने पाकिस्तान हैराण

कोरोनामुळे अर्थचक्र ठप्प झाले होते. मात्र, त्याला हळूहळू गती मिळतेय असं आता दिसून येतंय. २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत वस्तू उत्पादन कंपन्यांचा नफा वाढला आहे. खर्चाच्या तुलनेत विक्रीत वाढ झाल्यामुळे नफ्यात वाढ झाली आहे. सेवाक्षेत्रातील आयटी आणि बिगर आयटी कंपन्यांचा नफा वाढला आहे. स्थानिक निर्बंधाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असला तरीही वस्तू उत्पादन कंपन्या चांगली कामगिरी करीत आहेत. त्यामुळे भविष्यात आर्थिक विकासदराचे काय निकाल येतील ते येतील, मात्र, सध्या हाताला काम मिळून अर्थचक्र सुरु आहे, हा मोठा दिलासा आहे. त्यामुळे चालू वर्षाच्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत देशाच्या अर्थचक्राची गती वाढेल, अशी अपेक्षा आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com