परभणी: अतिवृष्टीच्या अनुदानासाठी २१ गावांमधील शेतकऱ्यांचे साखळी उपोषण...

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या अनुदानासाठी परभणीतील २१ गावांमधील शेतकऱ्यांचा लढा सुरु आहे. यासाठी त्यांनी साखळी उपोषण केले आहे.
परभणी: अतिवृष्टीच्या अनुदानासाठी २१ गावांमधील शेतकऱ्यांचे साखळी उपोषण...
परभणी: अतिवृष्टीच्या अनुदानासाठी २१ गावांमधील शेतकऱ्यांचे साखळी उपोषण...राजेश काटकर
Published On

परभणी: सन 2020 या वर्षी केवळ सेलु तालुक्यातील वालूर मंडळातील 21 गावे अतिवृष्टी अनुदानापासून वंचीत ठेवण्यात आली होती. अद्यापपर्यंतही या गावांना अतिवृष्टी अनूदान मिळाले नसल्याने तालुका दबाव गटाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सोमवार 15 नोव्हेंबर रोजी लाक्षणिक साखळी उपोषण करण्यात आले. (Chain fast of farmers of 21 villages for subsidy of excess rainfall in Parbhani)

हे देखील पहा -

सन 2020 मध्ये तालुक्यामध्ये सर्वदूर पाऊस झाला, तसेच 35 टक्के शेती पिकांचे नुकसान झाले होते. पाच मंडळांपैकी चार मंडळांना महसूल विभागाकडून अनुदान मिळाले मात्र वालूर मंडळातील 21 गावे तात्कालीन तहसीलदार व कृषी अधिकारी यांच्या चूकीच्या अहवालामूळे अनुदानापासून वंचीत राहिली आहेत. तालुका दबाव गटाच्या वतीने वेळोवेळी महसूल प्रशासनास निवेदने देवून अतिवृष्टी अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. मात्र केवळ अश्वासने देण्यात आली.

परभणी: अतिवृष्टीच्या अनुदानासाठी २१ गावांमधील शेतकऱ्यांचे साखळी उपोषण...
जळगाव आगाराचे सोळा कर्मचारी निलंबित

शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी साखळी उपोषण करत तात्काळ आपत्ती व्यवस्थापन निधीतून अतिवृष्टी अनुदान द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. जर तात्काळ अनुदान दिले नाही तर 8 डिसेंबर 2021 रोजी रस्ता रोको करण्यात येणार असल्याचे सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने नमुद करण्यात आले आहे. यासाठी सेलू तालुका दबाव गटाचे निमंत्रक अँड. श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ आदींनी पूढाकार घेतला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com