Cotton Cultivation: बुलढाण्यात कपाशी लागवडीला सुरुवात; शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागत पूर्ण, आता पावसाची प्रतीक्षा

Buldhana News Today: विविध संकटांवर मात करून पुन्हा उभा राहतोय बळीराजा...
Cotton Cultivation
Cotton CultivationSaam Tv
Published On

Buldhana Farmer News: गेल्या तीन चार वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना नापीकीचा सामना करावा लागतोय. मात्र या सर्व अस्मानी सह सुलतानी संकटांवर मात करत शेतकरी पुन्हा पुन्हा मोठ्या हिंमतीने उभा राहण्याचा प्रयत्न करतोय. शेतकऱ्यांनी पैशाची जोड जमा करून खरीप हंगामात पेरणीची तयारी केली आहे. (Latest Marathi News)

Cotton Cultivation
Buldhana News: सततची नापिकी, कर्जफेडीची विवंचना; अल्‍पभुधारक शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

यावर्षीच्या रब्बी हंगामात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस (Rain) आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील गहू, हरभरा, मका, कांदा यासह फळबागेचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे झाले.

मात्र, अजूनही शेतकऱ्यांना त्याची मदत मिळालेली नाही, पीक विमा पासून अजूनही हजारो शेतकरी वंचित आहेत. दुसरीकडे शेत मालाला देखील भाव नाही, अश्या एक ना अनेक अडचणींना शेतकरी (farmer) तोंड देत आहे. (Buldhana News)

Cotton Cultivation
Husband Wife Clash: पती-पतीच्या वादाचा भयानक अंत; नवऱ्याची हत्या करून मृतदेह किचनमध्ये जाळला, खळबळजनक घटना

आता खरीप हंगाम तोंडावर आलाय. त्यामुळे शेतकऱ्याने पेरणीसाठी पैशाची जोड जमा सुरू केली आहे. आणि ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे अश्या शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. तर कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत पूर्ण करून आता पावसाची प्रतीक्षा करत आहेत.

शेतकरी असंख्य संकटांना तोंड देताना पुरता हताश होतांना दिसतोय, या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी तोकडी मदत दिल्यापेक्षा त्यांच्या शेत मालाला योग्य भाव मिळाला तर शेतकऱ्याला कुणापुढे हात पसरवण्याची वेळच येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com