Sindhkhed Raja Farmers Morcha : शेकडो शेतक-यांनी बैलगाड्यांसह सिंदखेडराजा तहसील कार्यालयास घेरलं

या प्राण्यांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात पिकांचं व शेतमालाचे नुकसान होत आहे.
buldhana, farmers, sindhkhed raja
buldhana, farmers, sindhkhed rajasaam tv
Published On

Buldhana News : जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी बुलढाणा (buldhana) जिल्ह्यातील शेतकरी (farmers) आक्रमक झालेत. आज (साेमवार) शेकडो शेतक-यांनी बैलगाडी व कुटुंबीयांसह सिंदखेडराजा (sindhkhed raja) येथे तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या ठिकाणी शेतक-यांनी धरणे आंदोलनास (aandolan) प्रारंभ केला आहे. (Maharashtra News)

buldhana, farmers, sindhkhed raja
Rajula Hidami Success Story : दादा, मला पाेलिस व्हायचे आहे ! वाचा, माओवादी छावणीतून सुटका ते बारावीपर्यंतचा राजूला हिदामीचा प्रवास

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात वन्य प्राणी शेतीच व शेतमालाच मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत सिंदखेडराजा येथील जिजाऊ राजवाड्यासमोर धरणे आंदोलन करत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

buldhana, farmers, sindhkhed raja
Pune Bangalore National Highway Accident News : राेड राेलरला कारची धडक; पुणे-बंगळुर महामार्गावर दाेन ठार, चाैघे जखमी

या परिसरात मोठ्या प्रमाणात रोही, जंगली डुक्कर, हरण असल्याने शेतकऱ्यांना शेतीच नुकसान टाळण्यासाठी दिवसरात्र शेतात जागून काढावी लागत आहे. तसेच या प्राण्यांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात पिकांचं व शेतमालाचे नुकसान होत आहे.

अनेकदा हे जंगली प्राणी शेतकऱ्यांवर हल्ले देखील करत आहे त्यामुळे या प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शासनाने कारवाई करावी, शेतक-यांना शेताला कुंपण घालण्यासाठी 90 टक्के अनुदान द्यावे अशा मागण्या करत शेतकरी आक्रमक झाले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com