Tomato Prices Drop : टोमॅटोला कवडीमाेल दर, शेतकरी चिंतेत; सरकारकडून मदतीची अपेक्षा

दर मिळत नसल्याने शेतक-यांना शेतातच टोमॅटो सोडून द्यावे लागत आहेत.
buldhana, tomato, farmers
buldhana, tomato, farmerssaam tv

Buldhana News : संकट जणू काही शेतकऱ्यांच्या (farmers) पाचवीलाच पुजलय की काय असा प्रश्न सध्या उभा राहत आहे. त्याच कारणंही तसचं आहे. आधी अस्मानी संकट आणि नंतर सुलतानी संकट. याच फेऱ्यात शेतकरी यंदा अडकला आहे असं दिसत आहे. मोठ्या मेहनतीने लागवड केलेली टोमॅटोची बाग, भर उन्हात पाणी देऊन, मशागत करून उभी केली. मात्र उत्पन्नाच्या काळात टोमॅटोला फक्त दीड ते दोन रुपये किलोचा भाव (tomato price drops) मिळत असल्याने शेतकरी पुन्हा हवालदील होताना दिसत आहे. (Maharashtra News)

buldhana, tomato, farmers
Shahu Chhatrapati Gold Cup Football Tournament News : शिवाजी तरुण मंडळाने जिंकला शाहू छत्रपती गाेल्ड कप; Chenda वाद्याची राजघराण्याला भूरळ (पाहा व्हिडिओ)

बुलढाणा (buldhana) जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी आता आर्थिक अडचणीत सापडले आहेत. किलोला दीड ते दोन रुपये भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च तर सोडाच पण टोमॅटो तोडणीचा खर्चही निघत नसल्याने टोमॅटो शेतातच वाढत्या तापमानामुळे खराब होऊ लागला आहे.

buldhana, tomato, farmers
Saam Tv Exclusive : काेकणातील हापूस की कर्नाटकी ? आंबा खरेदीपुर्वी असं ओळखा (पाहा व्हिडिओ)

यामुळे शेतक-यांनी टोमॅटो (tomato) तोडणी सोडून दिली आहे. हजारो रुपये टोमॅटो लागवडीसाठी खर्च करूनही शेतकऱ्यांना भावा अभावी शेतातच टोमॅटो सोडून द्यावे लागत आहे. शासनाने अशा भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर करावे अशी मागणी शेतकरी करु लागले आहेत.

टोमॅटो उत्पादक शेतकरी मधुकर शिंगणे यांनी देखील टोमॅटोला उत्पादनापेक्षा अत्यंत कमी दर मिळत असल्याने सरकारनेच शेतक-यांच्या मदतीला धावलं पाहिजे असे नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com