विनोद जिरे
बीड:अतिवृष्टीचा मदतीवरून भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी सरकार निशाणा साधत मंत्री नवाब मलिक यांच्यावर गंभीर टीका केलीय. ते म्हणाले की राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणुन, ठाकरे सरकारने 10 हजार कोटी रूपये जाहिर केल्याचा गाजावाजा केला. मात्र प्रत्यक्ष मदत वाटप करताना शासकिय अधिकाऱ्याला हाताशी धरून, त्यात फार मोठा खोडा घातला. केवळ 75 टक्केच मदत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष वाटप सुरू झाल्याची माहिती मिळत आहे.
हे देखील पहा-
मराठवाड्यासाठी मदतीचा पहिला टप्पा, 3 हजार 762 कोटी रूपये 10 हजार कोटीच्या पॅकेजमधुन दिल्याचं सांगण्यात आलं. पण प्रत्यक्ष 2 हजार 821 कोटी रूपये पहिला हप्ता दिला असुन शेतकऱ्यांच्या पाठीत पुन्हा खंजीर खुपसुन जखमेवर मीठ चोळलं आहे. असा आरोप भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी सरकारवर केलाय. तर अतिवृष्टीचं संकट आणि त्याची तीव्रता झाकुन टाकण्यासाठी, सरकारने अल्पंसंख्यांक मंत्री नवाब मलिक, यांच्या तोंडुन पोपटपंची सुरू ठेवलीय. अशी गंभीर टिका भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केलीय.
यावेळी राज्य सरकारवर घणाघाती आरोप करताना ते म्हणाले की, या क्षणापर्यंत अजुनही शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे वाटप झालेलं नाही. नुकसानीचं संकट ज्यामुळे राज्यातील शेतकरी उद्धवस्त झाला. भरीव अशी मदत सरकारची सोडा या प्रश्नावर स्वत: मुख्यमंत्र्यांसह सरकारचे मंत्री चर्चाच करायला तयार नाहीत. एवढंच काय ? दु:खाच्या समुद्रात बुडत असलेल्या शेतकऱ्यांच्या मनात सरकारच्या भुमिकेवर प्रचंड संताप आहे. तो बाहेर पडु नये म्हणुन शाहरूख खानचा मुलगा आर्यन, याच ड्रग्स प्रकरण आणि त्यानंतर फुकटची पोपटपंची करणाऱ्या मंत्री नवाब मलिकांचे रोज वेगवेगळे बिनबुडाचे आरोप पाहता, जणु काही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचं लक्ष विचलित करण्यासाठी त्यांची पोपटपंची सुरू ठेवायला सरकारने भाग पाडले की काय ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
केवळ आकड्याचा खेळ सरकारने लावला असुन शेतकऱ्यांच्या जखमेवर पुन्हा पुन्हा मीठ चोळण्याचा प्रकार घडत आहे. या प्रश्नाकडे कुणाचं तांत्रिक लक्ष जावु नये आणि संतापलेला शेतकरी रस्त्यावर उतरू नये म्हणुन ठाकरे सरकारने नवाब मलिक यांच्यासारख्या मंत्र्याला हाताशी धरून रोज सुरू केलेली पोपटपंची हा जणु काही शेतकऱ्यांचा सुड उगवल्याचा प्रकार असल्याची टिका कुलकर्णी यांनी केलीय. अगोदर रक्कम जाहिर करायची आणि पुन्हा हात आखडता घ्यायचा ही खेळी म्हणजे दिवाळीत फराळाचं आमंत्रण द्यायचं आणि ताटात अर्धवट फराळ देवुन नकारात्मक मानसिकतेने वापस पाठवायचं. असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.