Rishi Kumar : वयाच्या 23व्या वर्षी लेफ्टनंट ऋषीकुमार यांना वीरमरण

नियंत्रण रेषेवर गस्तीदरम्यान भूसुरुंगाच्या स्फोटात शहीद झालेले बिहारचे सुपुत्र लेफ्टनंट ऋषी कुमार यांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे.
Rishi Kumar : वयाच्या 23व्या वर्षी लेफ्टनंट ऋषीकुमार यांना वीरमरण
Rishi Kumar : वयाच्या 23व्या वर्षी लेफ्टनंट ऋषीकुमार यांना वीरमरणSaam Tv
Published On

जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरच्या Jammu Kashmir राजौरी जिल्ह्यात शनिवारी (ता. ३१) रोजी नियंत्रण रेषेवर LOC गस्तीदरम्यान भूसुरुंगाच्या स्फोटात शहीद झालेले बिहारचे Bihar सुपुत्र लेफ्टनंट ऋषी कुमार यांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे. बेगुसराय येथील सिमरिया घाटावर शहिदांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार Funeral करण्यात आले.

हे देखील पहा-

रविवारी रात्री उशिरा पाटणा विमानतळावर शहीद लेफ्टनंट ऋषी कुमार यांचे पार्थिव पोहोचले. तर जीडी कॉलेज कॅम्पसमध्ये लष्कराच्या जवानांनी त्यांना मानवंदना दिली. तसेच श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर त्यांचे पार्थिव सिमरिया घाटात आणण्यात आले होते. जेथे शहीद ऋषी कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. लोकांनी पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांना निरोप दिला.

Rishi Kumar : वयाच्या 23व्या वर्षी लेफ्टनंट ऋषीकुमार यांना वीरमरण
नवाब मलिक यांची नार्कोटेस्ट करायला हवी- आशिष शेलार

शनिवारी जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ LOC पोस्टजवळ गस्त घालणारे एक पथक भूसुरुंगाखाली झालेल्या स्फोटात Blast बळी पडले. ज्यात दोन जवान शहीद झाले. स्फोटात शहीद झालेल्या दोन जवानांमध्ये बिहारच्या बेगुसराय येथील रहिवासी लेफ्टनंट ऋषी कुमार यांचा समावेश होता.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com