Beed News : शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या युरियाचा काळाबाजार; उद्योगांसाठी केला जातोय वापर, कृषी विभागाची कारवाई

Beed News : शेतकऱ्यांसाठी येणारा युरिया हा अनुदानित असतो. शेतकऱ्यांना ही बॅग २६६ रुपयांना मिळते. याची मुळ किंमत २२५७ रुपये आहे.
Beed News
Beed NewsSaam tv
Published On

बीड : शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या अनुदानित युरियाचा काळाबाजार सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार आष्टीमध्ये समोर आला आहे. या युरियाचा वापर उद्योगासाठी करण्यात येत होता. रॅकेटचा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला असून बीडच्या आष्टी तालुक्यातील घाटपिंप्री येथे टाकलेल्या धाडीत हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासात मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. 

शेतकऱ्यांसाठी (Farmer) येणारा युरिया हा अनुदानित असतो. शेतकऱ्यांना ही बॅग २६६ रुपयांना मिळते. याची मुळ किंमत २२५७ रुपये आहे. तर उद्योगाच्या वापरासाठी येणारा युरिया हा वेगळ्या पॅकींगमध्ये येतो. त्यावर कोणतेही अनुदान नसते. किंमतीत असलेल्या मोठ्या फरकामुळे याचा काळाबाजार करुन शेतकऱ्यांसाठी येणारा युरिया उद्योगासाठी पुरवण्याचा गोरखधंदा आष्टीत सुरु होता. हा युरिया प्लायवुड व पेंट इंडस्ट्रीसाठी पाठवला जात होता.

Beed News
Nandurbar News : हृदयद्रावक! ३ वर्षाच्या चिमुकलीसह मातेने घेतली नदीत उडी; सासरच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल

मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल 
शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या युरियाची अनेकदा टंचाई जाणवत असते. यामागे होणारा काळाबाजार कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी उघडकीस आणला आहे. (Beed) बीड- अहमदनगर रोडवर घाटापिंप्री शिवारात आबासाहेब शेळके यांच्या गोठ्याशेजारी असलेल्या खोलीची पाहणी केली असता तेथे युरियाच्या ५० भरलेल्या व रिकाम्या ७४४ बॅग आढळून आल्या. यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता जवळच असलेल्या खंडोबा वस्ती परिसरातील शरद घोडके यांच्या नव्याने बांधकाम झालेल्या इमारतीमधील साठ्याबाबत माहिती दिली. त्या ठिकाणी देखील पॅकींगचे साहित्य आढळून आले. या कारवाईत १ लाख ४० हजार ६८९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी आबासाहेब शेळके याच्या विरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com