बीड : यंदा खरीप हंगामातील पिकांचे अति पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड देखील मिवठ्या प्रमाणात केली होती. मात्र अति पावसामुळे काहींचे कांदा सोडून गेला होता. तर आता वातावरण बदलले असून धुके पडू लागल्याने कांद्याचे पीक धोक्यात आले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
बीडच्या (Beed) लिंबागणेश परीसरात पहाटे पडलेल्या दाट धुक्यामुळे रब्बी हंगामातील कांदा पिकांवर विघ्नाच्या भितीने शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदा शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कांद्याचे मोठ्या प्रमाणात पिक घेतले असून महागामोलाचे (Onion Crop) कांदा बियाणे आणि रोपे खरेदी करून लागवड करण्यात आली आहे. मात्र वातावरणातील लहरीपणामुळे कांदा पिकांवर करपा, मावा, किड रोगाच्या प्रादुर्भावामुळे कांदा पीक धोक्यात आले आहे. रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
कांद्यावर पडलेल्या रोगराईमुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. कांदा पिकावर रोग पडला असल्याने शेतकरी त्यावर फवारणी करू लागला आहे. मात्र काही ठिकाणी हि रोगराई अजूनही कमी होण्याचे नाव घेत नाही. मुख्य म्हणजे महागडे औषधी घेऊन फवारणी करत असल्याने शेतकऱ्याच्या खर्चात वाढ झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.