Beed News: फळ प्रक्रिया उद्योग नसल्याने सीताफळ उत्पादक शेतकरी अडचणीत

फळ प्रक्रिया उद्योग नसल्याने सीताफळ उत्पादक शेतकरी अडचणीत
Beed News
Beed NewsSaam tv
Published On

बीड : बीड जिल्हा हा बालाघाट डोंगर रांगात वसलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या डोंगर रांगेवर अन्‌ जिल्ह्यात (Beed News) गावरान सीताफळाची झाडे मोठ्या प्रमाणात दिसतात. त्याचबरोबर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी (Farmer) संकरित सीताफळाची मोठ्या प्रमाणात लागवड केल्याचे पाहायला मिळते. मात्र हे सीताफळ पिकल्यानंतर याला प्रक्रिया उद्योग नसल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात केवळ नऊ प्रक्रिया उद्योग आहेत. त्यामुळे फळ उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. (Tajya Batmya)

Beed News
Wardha News: विहीरीच्या मागणीसाठी नदी पात्रात उतरून आंदोलन

बीड (Beed) जिल्ह्यातील शेतकरी आता पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळलाय. मोठ्या प्रमाणात आता या आधुनिक शेतीतून फळबागेची लागवड शेतकरी करतोय. जिल्ह्यात यंदा तब्बल 14 हजार 594 हेक्टरवर फळबागेची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, द्राक्षे, चिकू, केळी, आंबा, का. लिंबू, पपई, सीताफळ या फळांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आता बागेची लागवड केली असताना देखील जिल्ह्यात केवळ 9 फळ प्रक्रिया उद्योग आहेत. तर सीताफळासाठी एकही फळ प्रक्रिया उद्योग नाही. यामुळे सीताफळ उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्याला उत्पन्नात तोटा देखील सहन करावा लागतोय.

याविषयी शेतकरी नितीन मसुदिवे म्हणाले, की बीड जिल्ह्यात कृषी विभागाकडून फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन अनुदान दिले जाते. मात्र सरळ सरळ शेतकऱ्यापर्यंत त्याची रक्कम मिळत नाही. तर सीताफळ हे फळ परिपक्व झाल्यानंतर लवकर खराब होणार फळ आहे. त्यामुळे त्याला जास्त दिवस ठेवायचे असेल तर फळ प्रक्रिया उद्योग असणे गरजेचे आहे. मात्र जिल्ह्यात फळ प्रक्रिया उद्योग नसल्याने खूप अडचण येत आहे. यामुळे उत्पन्नात मोठी घट होत असल्‍याचे मसुदिवे म्हणाले.

सहन करावा लागतो आर्थिक तोटा

दरम्यान जिल्ह्यातील शेतकरी पारंपारिक शेतीला फाटा देत आता कुठेतरी आधुनिक शेतीची कास धरत आहे आणि याच धर्तीवर फळबागेकडे वाटचाल करतोय.मात्र जिल्ह्यात फळ प्रक्रिया उद्योग नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतोय. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्यासाठी शासनाने फळ प्रक्रिया उद्योग उभारावीत.अशी मागणी फळ उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे

सीताफळ प्रक्रिया उद्योग उभा राहतोय

बीड जिल्ह्यात 2021- 22 मध्ये जवळपास 2 हजार हेक्टर क्षेत्रावर सिताफळची लागवड झाली. जिल्ह्यात सिताफळ पीक हे नैसर्गिकरित्या येणारे पीक आहे. विशेष म्हणजे बीडच्या धारूर तालुक्यातील डोंगराळ भागात येणाऱ्या सीताफळाला भौगोलिक नामांकन प्राप्त झालेले आहे. या सीताफळाची नैसर्गिक चव व त्याचा स्वादिष्टपणा चाखून या सिताफळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच अनुषंगाने बीड जिल्ह्यात सीताफळ प्रक्रिया उद्योग उभे राहत आहेत. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणारी पंतप्रधान सूक्ष्म खाद्य अन्न योजना यांच्यामार्फत, जिल्ह्यामध्ये 9 प्रक्रिया उद्योग आहेत. यामध्ये सीताफळापासून पल्प आईस्क्रीमसह अनेक पदार्थ बनवण्याचे प्रक्रिया उद्योग जिल्ह्यात उभा राहत आहेत. अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी दिलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com