भर पावसात शेकडो शेतकरी रस्त्यावर; जिल्हाधिकारी कार्यालयावर रूमनं मोर्चा

भर पावसात शेकडो शेतकरी रस्त्यावर; जिल्हाधिकारी कार्यालयावर रूमनं मोर्चा
Beed News
Beed NewsSaam tv
Published On

बीड : अतिवृष्टी अनुदान, पिक विमा, पिक कर्ज वाटप यासह शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी आज किसान सभेच्यावतीने (Beed) बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रूमने मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघाला होता. (Beed Farmer News)

किसान सभेच्‍यावतीने काढण्यात आलेल्‍या मोर्चात शेकडो शेतकरी (farmer) सहभागी झाले होते. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (Heavy Rain) अतिवृष्टी अनुदान व पिक विमा 25 टक्‍के अग्रिम वगळल्याच्या विरोधात आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने रूमन मोर्चा काढण्यात आला. यात मोठ्या संख्येने शेतकरी हातात रुमने घेऊन सहभागी झाले होते. सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून निघाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com