Sangli Agriculture News: वटवाघळांच्या थव्याचा हल्ला; सात लाख रुपयांची द्राक्षे एका रात्रीत केली फस्त

Bats Destroyed The Vineyard: शेकडो वटवाघळांनी एका रात्रीत बाग उध्वस्त केली. पक्व द्राक्षघड खाऊन, तोडून टाकले. बागेत रात्रभर धिंगाणा घातला.
Bats Destroyed The Vineyard
Bats Destroyed The Vineyardविजय पाटील
Published On

Bats Destroyed The Vineyard: सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील लिंगनूर येथे वटवाघळांनी (Bats) द्राक्ष बाग फस्त केली आहे. अवधूत आणि शिवदूत शंकर माळी या २०-२२ वर्षांच्या भावंडांनी जीवापाड वाढविलेली आणि पिकलेली द्राक्षबाग (Vineyard) वटवाघळांनी एका रात्रीत फस्त केली. यामुळे सुमारे सात लाख रुपयांची द्राक्षे नष्ट झाली आहेत. या दणक्याने हाता-तोंडांशी आलेला घास वटवाघळांनी फस्त केल्यामुळे तरुण शेतकरी कोलमडून गेले आहेत. (Sangli Latest News)

Bats Destroyed The Vineyard
Sharad Pawar News: शरद पवार मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; पुढील 3 दिवस घेणार उपचार

दोन्ही भावंडांचे वडील आजारी होते, डोक्यावर सुमारे तेरा लाखांचे सोसायटी कर्ज होते. अशा परिस्थितीतही प्रचंड काबडकष्ट करून यंदाही बाग जोमात फुलवला होता. बागेची विक्री सुध्दा सुमारे 530 रुपये पेटी प्रमाणे विक्री झाली होती. त्यातच एका रात्रीत वटवाघळांचा प्रचंड थवा आला आणि सुमारे एक एकर परिसरातली द्राक्षे फस्त केली, त्यामुळे आता या भावंडांवर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे. यासाठी ते शासनाकडे मदतची मागणी करत आहेत.

Bats Destroyed The Vineyard
Agriculture News: कांदा पिकावर हवामान बदलाचा परिणाम

आरके जातीची हा द्राक्षबाग होती. गेली १०-१५ वर्षे माळी कुटूंब द्राक्षे पिकवत आहे. यावर्षी वडील अंथरुणाला खिळून असल्याने भावंडांनीच बाग सांभाळली. चांगल्या दराच्या अपेक्षेने जूनमध्ये आगाप छाटणी घेतली. पाऊस, वाऱ्या-वादळापासून बचावासाठी छत घातले. बागेतील माती आणि चिखलामुळे द्राक्षघड खराब होऊ नयेत यासाठी सरींमध्येही कागद अंथरला. धुवॉंधार पावसातही बाग टिकून राहिली. (Agriculture News)

व्यापाऱ्यांनी ५३० रुपयांना चार किलो असा विक्रमी भाव सांगितला. दिवाळीनंतर उतरणीचे नियोजन होते. पण, तत्पूर्वीच वटवाघळांचा हल्ला झाला. शेकडो वटवाघळांनी एका रात्रीत बाग उध्वस्त केली. पक्व द्राक्षघड खाऊन, तोडून टाकले. बागेत रात्रभर धिंगाणा घातला. अवधूतला सकाळी बागेत द्राक्षांचा सडा आणि चिखल दिसून आला. (Maharashtra News)

Bats Destroyed The Vineyard
Pune News: पुण्यातील 'या' परिसरातले रस्ते सर्वात खराब; वाहतूक पोलिसांनी खड्डेमय रस्त्यांची यादी थेट महापालिकेला पाठवली

हा दणका न पेलवणारा ठरला आहे. वटवाघळांचे हल्ले पाहता अवधूतने या बागेभोवती तातडीने जाळी लावली आहे. बागेत रात्रभर प्रखर दिवे सुरु ठेवले. पण वटवाघूळांच्या बंदोबस्ताचा प्रयत्न करूनही काही उपयोग झाला नसल्याचे शेतकरी माळी यांनी सांगितले. तर यावेळी मिरजेतील राष्ट्रवादी नेते बाळासाहेब व्हॅनमोरे यांनी या द्राक्ष बागेला भेट दिली आणि मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com