Soyabean Fake Seeds : शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांचा फटका; सोयाबीनची पेरणी केल्यानंतरही उगवलेच नाही

Amravati News : पंधरा दिवस होऊन देखील बियाणे उगविले नसून शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. शेतकरी आपापल्या शेतात गेले असता त्यांना शेजारच्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेले सोयाबीन उगवलेले दिसले
Soyabean Fake Seeds
Soyabean Fake SeedsSaam tv
Published On

अमर घटारे 
अमरावती
: खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसणूक केली जात असते. असाच प्रकार अमरावती जिल्ह्यात समोर आला आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे खरेदी करत पेरणी केली. मात्र पंधरा दिवस झाल्यानंतर देखील हे बियाणे उगवलेच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बोगस बियाण्यांची बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे दिसुन येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिरजगाव, मोझरी, अनकवाडी येथील शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा फटका बसला आहे. रजगांव मो. येथील बऱ्याच शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादनाच्या हमीवर यंदा बापना कंपनीच्या सोयाबीन बियाण्याची खरेदी करत पेरणी केली. सर्रास शेतकऱ्यांनी लाॅट नं.०००७८९ क्रमांकाच्या सोयाबीन बियाण्याची खरेदी केली. परंतु हा लाॅट नंबरच बोगस निघाल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे. 

Soyabean Fake Seeds
Shirdi Sai Mandir : साई मंदिरात ब्रेक दर्शन व्यवस्था लागू; महत्त्वाच्या व्यक्तींना विशिष्ट वेळेतच घेता येणार दर्शन

करावी लागणार दुबार पेरणी 

पंधरा दिवस होऊन देखील बियाणे उगविले नसून शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. शेतकरी आपापल्या शेतात गेले असता त्यांना शेजारच्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेले सोयाबीन उगवलेले दिसले. मात्र ज्या शेतकऱ्यांनी बापना कंपनीचे सोयाबीन पेरले त्यांच्या शेतात दाणाही उगवलेला दिसला नाही. या क्षेत्रफळ बाधीत झाले असुन शेतकऱ्यांवर सुरुवातीलाच आर्थिक संकट कोसळले आहे.

Soyabean Fake Seeds
Nandurbar Heavy Rain : नंदुरबारमध्ये तुफान पाऊस; मोलगी- पिंपळखुटा भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला

कंपनी देणार भरपाई 

दरम्यान बापना या कंपनीचे बियाणे लागवड केलेल्या सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बियाणे विक्रेता व कंपनीचे एरिया मॅनेजर यांना शेतात बोलावून वस्तुस्थिती दाखविली. तेव्हा बियाण्यांमध्ये दोष असल्याचे मान्य करुन शेतकऱ्यांना दोन दिवसात नुकसान भरपाई देणार असल्याचे कंपणीकडुन आश्वस्त करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com