Bogus Fertilizer : डीएपी खताच्या बॅगेत माती; अमरावतीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक, कृषी विभागाकडून कारवाई

Amravati News : अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथील एका कृषी केंद्रातील खताचे नमुने घेतले असता त्याचा अहवाल आल्यानंतर त्यामध्ये माती असल्याचे उघडकीस आलं आहे.
Bogus Fertilizer
Bogus FertilizerSaam tv
Published On

अमर घटारे 
अमरावती
: शेतकरी पिकांची वाढ होण्यासाठी खत खरेदी करत आहेत. मात्र शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या डीएपी खतांच्या बॅगेत माती आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यांना बोगस डीएपी खतांची विक्री करणाऱ्या आणि मिश्र खतांच्या नावाखाली माती विकणाऱ्या कंपनीवर अमरावती कृषी कारवाई करत हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे. 

Bogus Fertilizer
VIDEO: ४० विद्यार्थ्यांसह बस रुळावर अडकली अन् भरधाव ट्रेन आली, काळजाचा ठोका चुकवणारा क्षण; मोठा अनर्थ टळला!

अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथील एका कृषी केंद्रातील खताचे नमुने घेतले असता त्याचा अहवाल आल्यानंतर त्यामध्ये माती असल्याचे उघडकीस आलं आहे. पुण्यातील खत निर्माण करणारी मे रामा फर्टीकेम लिमिटेड या कंपनीने (Amravati) अमरावती जिल्ह्यात ३ हजार ३०० बॅग डीएपी आणि १० :२६ :२६ या खताच्या २ हजार १०० बॅग अशा ५ हजार ४०० खतांच्या बॅगची विक्री केली आहे. यामध्ये अनेक नमुने हे चुकीचे आढळून आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल असून शेतकऱ्यांचे (Farmer) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

Bogus Fertilizer
Nandurbar Water Shortage : भर पावसाळ्यात नंदुरबारकरांना पाच दिवसाआड पाणीपुरवठा; धरणात अवघा २१ टक्के पाणीसाठा

४५३ बॅग जप्त करत एकाजनावर गुन्हा दाखल 

याबाबत कृषी विभागाने कारवाई केली असून या कारवाईत कंपनीचे ४५३ खतांचे पोती जप्त करण्यात आली असून यामध्ये एका अधिकाराविरुद्ध अमरावती शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तर खत विक्री करणाऱ्या कंपनी आणि विक्री करणाऱ्या  विरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com