White Onion : अलिबागचा औषधी पांढरा कांदा बाजारात दाखल; २५० रुपयांपर्यंत मिळतोय भाव

Alibag news : भात कापणीनंतर पुढे दोन महिने जमिनीत ओलावा टिकतो. जमिनीतील त्या ओलाव्यावर पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. यातूनच या कांद्याचे उत्पादन येथील शेतकरी घेत असतात
White Onion
White OnionSaam tv
Published On

सचिन कदम

अलिबाग (रायगड) : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुका येथील निसर्गरम्य समुद्र किनाऱ्यासोबत येथे पिकणाऱ्या पांढऱ्या कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. अलिबाग तालुक्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असून सध्या कांदा काढणी करण्यात आहे. औषधी गुणधर्मासाठी सर्वश्रृत असणारा अलिबागचा पांढरा कांदा सध्या बाजारपेठेत दाखल झाला असून याची मागणी देखील विक्री देखील जोरदार सुरु झाली आहे.  

अलिबाग तालुक्यातील नेहुली, खंडाळे, कार्ले, तळवली या गावांमध्ये या पांढऱ्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या पांढऱ्या कांद्यामुळे शेतकऱ्यां बरोबरच ग्रामिण भागातील महिलांना देखील चांगले उत्पन्न मिळते. भात कापणीनंतर पुढे दोन महिने जमिनीत ओलावा टिकतो. जमिनीतील त्या ओलाव्यावर पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. यातूनच या कांद्याचे उत्पादन येथील शेतकरी घेत असतात. 

White Onion
Ulhasnagar Police : नियम मोडायचा 'डुप्लिकेट', दंड व्हायचा 'ओरिजनल'ला; उल्हासनगरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा पकडल्या

२५० रुपयांपर्यंत कांद्याची माळ 

दरम्यान या कांद्याला वाढती मागणी आणि चांगली किंमत मिळत असल्याने गेल्या काही वर्षात पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. सध्या लहान कांदा २०० रुपये माळ तर मोठा कांदा २५० रुपये माळ या दराने विकला जात आहे. सुरवातीच्या हंगामात कांद्याचे दर अधिक असले तरी आवक वाढल्यावर हे दर कमी होतील अशी अपेक्षा आहे. तर पांढऱ्या कांद्याचे उत्पादन वाढण्यासाठी शासनाने शेतीसाठी मुबलक पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

White Onion
Poshan Aahar : अंगणवाडीतील पोषण आहारात अळ्या; मुलांच्या जीवाशी खेळ, संतप्त पालकांकडून तक्रार

कांद्यात असलेले औषधी गुणधर्म

अभ्यासकांच्या माहितीनुसार या पांढऱ्या कांद्यात औषधी गुणधर्म मोठ्या प्रमाणात आहेत. कांद्यात मिथाईल सल्फाईड आणि अमीनो ॲसिड हे घटक असतात. ज्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. हा कांदा खाल्ल्याने पोटातील उष्णता कमी होण्यासाठी उपयुक्त ठरतो. यामुळेच या कांद्याला अधिक मागणी होत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com