PM Kisan Yojana: अद्याप २३ हजारांवर शेतकऱ्यांचे आधार जोडणी बाकी

अद्याप २३ हजारांवर शेतकऱ्यांचे आधार जोडणी बाकी
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam tv
Published On

अकोला : पंतप्रधान किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा हप्ता हवा असल्यास प्रत्येक शेतकऱ्याने (Farmer) बँक खात्यासोबत आधार जोडणे आवश्यक आहे. परंतु, (Akola News) जिल्‍ह्यातील अद्याप २३ हजार २३२ शेतकऱ्यांचे आधार जोडणी बाकी राहिलेली आहे. (Tajya Batmya)

PM Kisan Yojana
Jalgaon News: धक्‍कादायक..अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; सात तरुणांसह इतर तीन ताब्यात

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला तीन समान हप्त्यात दोन हजार रुपये दिले जातात. दोन हजार रुपये हप्त्याची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यासाठी प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याने बँक खात्यासोबत आधार जोडणे अनिवार्य असून पोस्ट ऑफिसने प्रत्येक गावात ही सुविधा गावातच उपलब्ध करून दिली आहे.

PM Kisan Yojana
Sangli News: घरफोडी करणारी टोळी जेरबंद; दीड लाखाच्‍या मुद्देमालासह तिघे ताब्‍यात

शेतकऱ्याने बँक खात्यासोबत आधार जोडणीसाठी पोस्ट ऑफिसने प्रत्येक गावात आधार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येत्या १५ मेपर्यंत गावातच शेतकऱ्यांना आधार जोडणी करता येणार आहे. जिल्ह्यात अद्याप आधार जोडणी बाकी असलेल्या २३ हजार २३२ शेतकऱ्यांना गावातच बँक खात्यासोबत आधार जोडावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com