Sangli News
Sangli NewsSaam tv

Sangli News: घरफोडी करणारी टोळी जेरबंद; दीड लाखाच्‍या मुद्देमालासह तिघे ताब्‍यात

घरफोडी करणारी टोळी जेरबंद; दीड लाखाच्‍या मुद्देमालासह तिघे ताब्‍यात
Published on

सांगली : सांगली जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मिरज ग्रामीण हद्दीत घरफोडी करणाऱ्या (Sangli News) टोळीला जेरबंद केले आहे. (Gold) सोन्‍या– चांदीच्‍या दागिन्‍यांसह सिलेंडर, गाडी, मोटारसायकल असा मुद्देमाल जप्‍त केला आहे. (Live marathi News)

Sangli News
Nanded Crime News: नांदेडमध्ये खळबळ! टीव्हीचा आवाज बंद न झाल्याने आला संशय; दरवाजा उघडताच दिसलं भयंकर

सौदागर वसीम मुल्ला आणि गणेश माने ह्या तिघांनी मोटरसायकल, सिलेंडर आणि सोन्या– चांदीचे दागिने चोरी केले. हा मुद्देमाल विक्री करण्यासाठी रेल्वे स्थानकच्या पाठीमागे उभे असल्याची गोपनीय माहिती सांगली जिल्हा गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. या तिघांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर मिरज म्हैसाळ रस्त्यावर आणि सुभाषनगर येथील मोटरसायकल चोरी, मालेगाव रोड रेल्वे ब्रिजजवळ पोल्ट्री शेजारी घराचा बंद दरवाजा उचकटून सोन्या– चांदीचे दागिने २ सिलेंडर असा मुद्देमाल चोरल्याचे चार गुन्हे केल्याची तिघांनी कबुली दिली आहे.

Sangli News
Jalgaon News: धक्‍कादायक..अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; सात तरुणांसह इतर तीन ताब्यात

मुद्देमालासह तिघे ताब्‍यात

अनिस अल्ताफ सौदागर (रा. सुभाष नगर मिरज), वसीम अल्लाबक्ष मुल्ला (रा. संजय गांधीनगर झोपडपट्टी सांगली), गणेश विष्णू माने (रा. भारतनगर मिरज) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांकडून १ लाख ४४ हजार ८५० रुपये किंमतीचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com