Agriculture News : कपाशीवर किडीचा प्रादुर्भाव; कामगंध सापळ्या द्वारे किडींचे नियंत्रण

Akola News : किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवण्याचा प्रयत्न असतो, कीडनाशकांचा मर्यादित आणि अचूक वापर केल्यास पिकांचे नुकसान टाळण्यासोबतच वातावरणाचा समतोल राखता येतो
Agriculture News
Agriculture NewsSaam tv
Published On

अक्षय गवळी 

अकोला : अति पाऊस झाल्याने पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. यानंतर पिकांवर रोगराई पसरण्यास सुरवात झाली असून कपाशीवर देखील किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढल्याचे पाहण्यास मिळत आहे. दरम्यान पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये मशागत, कीड प्रतिकारक वाणाचा वापर यासह यांत्रिक, भौतिक, जैविक पद्धतींचा संयुक्तिक वापर केला जात आहे.

कपाशीवर किडीचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी आता कामगंध सापळ्यांचा वापर करू लागला आहे. याद्वारे किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवण्याचा प्रयत्न असतो, कीडनाशकांचा मर्यादित आणि अचूक वापर केल्यास पिकांचे नुकसान टाळण्यासोबतच वातावरणाचा समतोल राखता येतो.

Agriculture News
Soyabean Crop : सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत; पाने खाणारी आणि शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव

कामगंध सापळा म्हणजे काय?
पतंगवर्गीय कीटकामध्ये (Lepidoptera) मादी आणि नर यांचे मिलन होण्यासाठी एका विशिष्ठ प्रकारच्या गंध सोडला जातो. काही किटकांच्या प्रजातींमध्ये नराद्वारे सोडलेल्या गंधाकडे स्वजातीय मादी आकर्षित होते. तर काहींमध्ये मादी नराला आकर्षून घेण्यासाठी आपल्या शरीरातून गंध सोडते. अशा गंधामुळे विजातीय पतंग आकर्षिले जातात. कापसावरील बोंड अळ्यांचा मादी पतंग विशिष्ठ प्रकारचा गंध आपल्या शरीराद्वारे सोडतात, नर पतंग त्याकडे आकर्षिले जातात. असे गंध कृत्रिमरीत्या तयार करून गोळ्यांच्या स्वरूपामध्ये सापळ्यामध्ये वापरले जातात. या गोळ्यांना ल्यूर अथवा सेप्टा म्हणतात; त्या प्लॅस्टिकच्या सापळ्याला कामगंध सापळे म्हणतात. 

Agriculture News
Yawal Crime : शेजाऱ्याचे भयानक कृत्य; फूस लावून बालकाचे अपहरण करत केली हत्या, गच्चीवरच मृतदेह जाळण्याचा प्रयत्न

कामगंध सापळा लावण्याचा फायदा 

कपाशीच्या पिकात कामगंध सापळा लावल्यास किडीच्या आगमनाचे संकेत त्वरित मिळतात. त्यानुसार व्यवस्थापनाची दिशा निश्चित करता येते. तसेच किडींची आर्थिक नुकसानीची पातळी निश्चित करता येते. जसे अमेरिकन बोंड अळीचे ८-९ पतंग प्रति सापळा सतत ५-६ दिवस आढळणे. कीड नियंत्रणासाठी वापर केल्यास रासायनिक कीटकनाशके आणि मजुरीचा खर्च कमी होतो. मुख्य म्हणजे किडींची संख्या कमी असतानाच सापळ्याद्वारे पिकाचे संभाव्य नुकसान टाळता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com