Sangali: शॉर्ट सर्किटमुळे 15 एकरातील ऊस जळून खाक; 25 एकरातील ऊस वाचला

बारापट्टा क्षेत्रात विद्युत वाहक तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे शॉर्ट सर्किट झाल्याने येथील उसाला आग लागली.
Sangali
SangaliSaam TV
Published On

सांगली: सांगलीच्या कडेगाव येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत बारा पट्टा परिसरातील सुमारे 15 एकरावरील ऊसासह ठिबकचे साहित्य जळून खाक झाले आहे. महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांचे (Farmer) लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज दुपारी घडली आहे, तर येथील स्थानिक शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केल्याने पुढील पंचवीस एकरातील ऊस आगीपासून वाचवण्यात यश आले.

बारापट्टा क्षेत्रात विद्युत वाहक तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे शॉर्ट सर्किट झाल्याने येथील उसाला आग लागली. त्यामुळे येथील अल्पभूधारक शेतकरी नितीन शिंदे, प्रकाश शिंदे, भीमराव जाधव, तानाजी भोसले, मोहन जाधव यांच्या मालकीचे सुमारे 15 एकरातील उसाचे क्षेत्र जळून खाक झाले. यावेळी आग विझवण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे आगीपासून इतर क्षेत्रातील ऊस बचावला.

यापूर्वी शेतकऱ्यांनी संभाव्य धोका ओळखून विजेच्या लोंबकळत असलेल्या विद्युत तारांची ओढ काढण्याबाबत, तसेच डीपी दुरुस्तीची विनंती केली होती. परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. महावितरणने शेतकऱ्यांच्या विनंतीची दखल घेत त्या अनुषंगाने ऊसक्षेत्रात लोंबणा-या तारांची व डीपीची दुरुस्ती केली असती तर ऊस जळाला नसता.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com