Satara News : भरपाईच्या प्रतिक्षेतील शेतक-यांना दिलासा; अतिवृष्टिबाधितांसाठी 14 कोटी 4 लाखांचा निधी मंजूर

या निर्णयामुळे शेतक-यांना दिलासा मिळणार आहे.
satara, farmers
satara, farmerssaam tv
Published On

Satara News : गतवर्षी सप्टेंबर, ऑक्टोंबर महिन्यात अतिवृष्टिमुळे शेतपीकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी शासनाकडून (maharashtra government) निधी मंजूर झाला आहे. सातारा (satara latest news) जिल्हयातील 21 हजार 487 शेतकऱ्यांना (21 thousand 487 farmers from satara may get benefit) 14 कोटी 4 लाख 18 हजार रुपयांचा निधी (14 crores 4 lakhs fund for satara) मिळणार आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. या निर्णयामुळे भरपाईच्या प्रतिक्षेत असलेल्या बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Maharashtra News)

satara, farmers
Shri Sant BaluMama Trust News : श्री संत बाळूमामा देवस्थानच्या ट्रस्टच्या कार्याध्यक्ष निवड संपन्न; धैर्यशील भोसलेंची अनुपस्थिती

गतवर्षी सप्टेंबर, ऑक्टोंबर महिन्यात जिल्हयात अतिवृष्टी झाली होती. पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले होते. प्रशासनानेही युद्धपातळीवर पंचनामे करुन नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर केला होता.

त्यानुसार फलटण तालुक्यातील 2 हजार 658 शेतकऱ्यांच्या 873.20 हेक्टरसाठी 2 कोटी 28 लाख 44 हजार रुपये, कोरेगाव तालुक्यातील 684 शेतकऱ्यांच्या 207.73 हेक्टरसाठी 35 लाख 88 हजार, कराड तालुक्यातील 168 शेतकऱ्यांच्या 33.14 हेक्टरसाठी 6 लाख 7 हजार, महाबळेश्वर तालुक्यातील 544 शेतकऱ्यांच्या 175.87 हेक्टरसाठी 47 लाख 56 हजार, पाटण तालुक्यातील 372 शेतकऱ्यांच्या 40.61 हेक्टरसाठी 3 लाख 93 हजार रुपये शेतक-यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.

satara, farmers
Market Committee Election News :सर्वांत माेठी बातमी; बाजार समितीच्या निवडणुकीस स्थगिती, न्यायालयाचा आदेश

खंडाळा तालुक्यातील 7 हजार 780 शेतकऱ्यांच्या 1855.37 हेक्टरसाठी 4 कोटी 33 लाख 25 हजार, खटाव तालुक्यातील 4 हजार 433 शेतकऱ्यांच्या 1547.52 हेक्टरसाठी 3 कोटी 64 लाख 39 हजार, माण तालुक्यातील 3 हजार 221 शेतकऱ्यांच्या 1050.37 हेक्टरसाठी 2 कोटी 58 लाख 46 हजार.

satara, farmers
Bus Concession For Women : अय्या खरंच...पण कूठं ! खासगी ट्रॅव्हल्समध्येही महिलांना 50 टक्के सवलत (पाहा व्हिडिओ)

सातारा तालुक्यातील 32 शेतकऱ्यांच्या 7.76 हेक्टरसाठी 1 लाख 11 हजार, जावली तालुक्यातील 73 शेतकऱ्यांच्या 3.18 हेक्टरसाठी 77 हजार व वाई तालुक्यातील 1 हजार 522 शेतकऱ्यांच्या 178.43 हेक्टरसाठी 24 लाख 32 हजार असे एकूण 21 हजार 487 शेतकऱ्यांच्या 5973.18 हेक्टरसाठी 14 कोटी 4 लाख 18 हजार रुपये नुकसानभरपाई शासनाकडून मंजुर करण्यात आली आहे.

शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे भरपाईच्या प्रतिक्षेत असलेल्या बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com