परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणे हा बहुतेक लोकांचा एक मोठा स्वप्न असतो.
परदेशात शिक्षण घेताना होणाऱ्या खर्चाबाबत विचार करणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरतं. जाणून घेऊया की कोणत्या देशामध्ये सर्वात स्वस्त शिक्षण मिळते.
विदेशात शिक्षण घेण्यासाठी जर्मनी हा एक उत्कृष्ट पर्याय आहे कारण याठिकाणी विदेशी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण घेता येतं.
सरकारी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना फक्त प्रशासकीय शुल्क (Administrative Fees) भरावे लागते.
याशिवाय, जर्मनीमध्ये राहणीमान आणि अन्नपदार्थांसाठी दर महिन्याला सुमारे 70,000 ते 1,00,000 रुपयांचा खर्च येतो.
तसेच परदेशात शिक्षण घेण्यासाठी आपण नॉर्वे, पोलंड, मेक्सिको आणि फ्रान्स यांसारख्या देशांचा पर्याय देखील निवडू शकता.
या देशांमध्येही ट्यूशन फी खूपच कमी आहे आणि राहणीमानाचा खर्चसुद्धा खिशाला परवडणारा असतो.
मलेशियामध्ये शिक्षणासाठी कमी ट्यूशन फी असून ५ ते १० लाख रुपयांत पूर्ण वर्ष सहज काढता येतं.