आज कोणतीही गोष्ट करताना विचारपुर्वक करा. अडथळ्यातून मार्ग काढा. अचानक धनलाभ होईल.
कला मनोरंजन क्षेत्रामध्ये विशेष आघाडीवर रहाल. कामे तर होतीलच पण आनंदाने सहभाग घ्याल. फायदा संभवतो आहे.
खोकल्याचे आजार, जुना दमा, मानसिक ताण त्रास याच्यामुळे काही जणांना त्रास संभवतो आहे.
आज गौरी आवाहनाचा दिवस आहे. शिव - गौरी उपासना आज आपल्यासाठी फलदायी ठरेल. धनाचे आगमन सुद्धा आपल्या राशीला होणार आहे.
एखादी मोठी जबाबदारी अंगावर घेऊन कामे करावी लागतील. कुटुंबीयांचे सहकार्य असेलच.
वक्तृत्व क्षेत्रात आपली कामगिरी बहरणार आहे. शेजाऱ्यांचे सहकार्य मिळेल. प्रेमळ भावंडांच्या बरोबरीने आजचा दिवस सुखाचा जाईल.
व्यवसायामध्ये अडचणी येतील. मात्र कुटुंबीयांचे सहकार्य चांगले राहील. घरी पाहुण्यांची मांदयाळी असेल. स्नेहभोजनाचे योग येतील.
मनासारख्या गोष्टी आज घडणार आहेत. ठरवाल ते करायलाच. उत्तम आयोजन आणि नियोजन यामुळे यश मिळेल.
काही वेळेला निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होते. आजचे निर्णय मात्र काळजीपूर्वक घ्यावेत. मोठे प्रवास होतील.
जुने मित्र भेटतील. गप्पांमध्ये वेळ चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी धनाची आवक चांगली राहील.
सामाजिक क्षेत्रात आणि राजकारणामध्ये आज आघाडीवर रहाल. आपल्या सहकाऱ्यांच्यामुळे प्रगती होण्याचा दिवस आहे.
सद्गुरूंची कृपा राहील. दानधर्म, धार्मिक कार्यामध्ये पुढाकार घ्याल. मनस्थिती चांगली राहील.