Sakshi Sunil Jadhav
तुळस ही प्रत्येकाच्या घरात असतेच. तुळशीला वास्तुशास्त्रानुसार खूप महत्वही दिले जाते.
तुम्हाला माहितीये का? तुळशीचे काही नियम असतात.
पुढे तुम्हाला तुळशीच्या आजुबाजुला कोणते रोप लावू नये? याबद्दलची माहिती आणि महत्व पुढे समजणार आहे.
तुळशीचे रोप हे घराच्या दारात लावणे म्हणजे लक्ष्मीची कृपा त्याघरावर असणे.
तुम्ही जर तुळशीच्या झाडाच्या बाजूला ही रोपं लावलीत की, तुमच्यावर आर्थिक संकट येऊ शकतं.
लिंबाचं झाड जर आजुबाजुला लावलं तर तुमच्या आयुष्यातली होणारी कामं ही अपूर्णच राहतात आणि त्यात अडथळे सुद्धा येतात.
लाजाळूचं झाड तुळशीच्या शेजारी लावल्याने कुटुंबात अनेक वाद निर्माण होऊ शकतात. तसेच आर्थिक चणचण वाढू शकते.
केळीचं झाड जर तुळशीच्या झाडाशेजारी लावत असाल. तर तुम्हाला याचा खूप आर्थिक फायदा होईल.