वेब स्टोरीज

उंचावरून उडी मारूनही पायांवर कशा पडतात मांजरी?

आपण अनेकदा पाहिले आहे की, मांजर कितीही उंचावरून किंवा अगदी उलटी (Upside Down) पडली तरी ती अगदी कमी वेळेत हवेत स्वतःला वळवून सुरक्षितपणे आपल्या चारही पायांवर अलगद उतरते.

Surabhi Jayashree Jagdish

मांजर

तुम्ही मांजरींना झाडावरून, बाल्कनीतून किंवा भिंतीवरून सहज उड्या मारताना पाहिलंच असेल. त्या जितक्या उंचावरून उडी मारतात, तितक्याच सुरक्षितपणे त्या जमिनीवर उतरतात. हे पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटतं.

मांजर पायांवरच का उतरते?

नेहमी मांजरी आपल्या पायांवरच उतरतात आणि दुखापत टळते. मग अखेर असं काय असतं की त्या नेहमी स्वतःला सुरक्षित ठेवतात? चला, या मागचं कारण समजून घेऊया.

कॅट रायटिंग रिफ्लेक्स

मांजरींमध्ये 'कॅट रायटिंग रिफ्लेक्स' नावाची खास क्षमता असते. ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे जी त्यांना पडताना शरीर योग्य दिशेने वळवण्यास मदत करते. यामुळे त्या नेहमी पायांवरच उतरतात.

हाडांचा बांधा

मांजरींच्या हाडांचा बांधाच खूप लवचिक असतो. त्यामुळे त्या पडताना शरीराला झटपट वळवू शकतात. ही लवचिकता त्यांना प्रत्येक परिस्थितीत संतुलन राखायला मदत करते.

इनर इअर

मांजरींचे कान (Inner Ear) त्यांच्या शरीराच्या दिशेची माहिती देतात. हवेत असतानाही त्यांना कोणत्या बाजूला आहेत हे समजतं. त्यामुळे त्या योग्य वेळी शरीराची स्थिती बदलतात.

संतुलन

मांजरींची शेपटी देखील संतुलन राखण्यासाठी खूप महत्त्वाची असते. शेपटीच्या मदतीने मांजरी शरीराला वळवतात आणि स्थिर ठेवतात.

परफेक्ट बॅलन्स

जेव्हा मांजर एका जागेवरून दुसऱ्या जागी उडी मारते, तेव्हा ती आपले पाय किंचित आकसून घेते. हे करताना ती शरीराचा भार नीट वाटून घेते. त्यामुळे तिचा बॅलन्स परफेक्ट राहतो.

शरीररचना आणि लवचिकता

असं म्हणता येईल की मांजरींची शरीररचना, लवचिकता, कानांची संवेदना आणि शेपटी यांचा सुंदर मेळ त्यांना इतक्या कौशल्याने उतरायला मदत करतो

Sindhudurg Tourism: सिंधुदूर्गात लपलेला शिवकाळातील दुर्मिळ किल्ला! महाराजांच्या साम्राज्यातील गुप्त रणनीतीस्थळ

Sanjay Raut: अजित पवारांनी निवडणुकीत पोलिसांच्या गाडीतून पैसे वाटले; संजय राऊतांचा गंभीर आरोप|VIDEO

पाकिस्तानची जिरवली; सीमेवरील चकमकीत ५८ पाकिस्तानी सैनिक ठार, तालिबानचा दावा

खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला, ५ महिलांवर कोयता अन् कुऱ्हाडीनं वार; नेमकं कारण काय?

Amravati : सोयाबीन काढणी करताना घडले दुर्दैवी; मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

Maharashtra Live News Update : वंजारी समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये आंदोलन

SCROLL FOR NEXT