Viral Video: वाह रे पठ्ठ्या! एका झटक्यात किंग कोब्राला पकडले, पाहा तरुणाची निंजा टेक्निक, VIDEO व्हायरल

Viral Video On Cobra: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे, ज्यात एक व्यक्ती एका झटक्यात हाताने किंग कोब्रा साप पकडतो. त्याचे कौशल्य पाहून अनेक लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
Viral Video
Viral Videosaam tv
Published On

साप पकडणाऱ्यांना साप पकडण्याचे तज्ञ मानले जाते, कारण साधा साप पकडणे सोपे असले तरी कोब्रा साप पकडणे अत्यंत कठीण आणि धोकादायक आहे. कोब्रा साप अत्यंत विषारी असून त्याला पकडणे खूप कौशल्याचे काम असते. विशेष लोक तंत्रज्ञान आणि उपकरणांचा वापर करून साप पकडले जातात.

परंतु काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हाताने झटक्याने कोब्रा साप पकडतो. त्याने इतक्या चपळतेने साप पकडला की कोब्रा सापाला त्याच्या हालचालींची माहिती मिळण्याआधीच तो काबूत करण्यात आला.

Viral Video
Viral Video: हद्दच झाली राव! ड्रायव्हिंग करताना PUBGचा नाद, प्रवाशाचा जीव धोक्यात; Viral Video पाहून नेटकऱ्यांचा संताप

व्हिडिओमध्ये एक माणूस कोणत्याही भीतीशिवाय किंग कोब्रा साप पकडताना दिसतो. तो सापाच्या जवळ उभा असताना दुसरी व्यक्ती भीतीने मागे जाऊन लपून बसला आहे. सुरुवातीला तो माणूस सापाला अडकवण्यासाठी त्याचा पाय दाखवतो आणि नंतर हळूहळू हात पुढे करतो. एका झटक्यात तो व्यक्ती सापाची मान पकडतो, ज्यामुळे कोब्रा सापाला काहीही समजण्याचा वेळ मिळाला नाही.

साप पकडल्यानंतर तो माणूस हसतो, आणि त्याच वेळी, मागे उभा असलेला दुसरा व्यक्ती सापाची शेपटी पकडून त्याला नियंत्रित करतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन लोक थायलंडमधील एका कॉलेजमध्ये कोब्रा साप पकडताना दिसतात. या व्हिडिओला '@gunsnrosesgirl3' नावाच्या वापरकर्त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Viral Video
Viral Video: पोरीचा स्वॅगच न्यारा...,एका हाताने स्कुटी, तर दुसऱ्या हाताने सुटकेस चालवली; हायवेवरील VIDEO व्हायरल

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगितले आहे की, हे दृश्य थायलंडमधील आहे, जिथे दोन लोक एकत्र कोब्रा साप पकडतात. या व्हिडिओला २९ लाख लोकांनी पाहिले असून, १० हजार लोकांनी त्याला लाईक केले आहे. अनेक यूजर्सनी व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहेत, जसे एका यूजर्सने घरी हे करण्याचा प्रयत्न करू नका आणि दुसऱ्याने कोब्रासोबत खेळणे योग्य नाही असे म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com