Viral Video: धावत्या रेल्वेमध्ये तरुणाचा जीवघेणा स्टंट; ट्रेनच्या छतावर चढताच विजेचा शॉक लागला अन्...

Stunt Viral Video: आपला स्टंट सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर आपल्याला भरपूर लाइक्स मिळतील आणि आपण व्हायरल होऊ असं त्याला वाटलं असेल. आता हा तरुण व्हायरल तर होतोय मात्र तो या जगात आहे की नाही याबाबत माहिती मिळाली नाही.
Viral Video
Viral VideoSaam TV
Published On

Mumbai Local Train:

मुंबईमध्ये लोकल ट्रेन म्हणजे सर्वांची लाईफलाईन झाली आहे. सर्व व्यक्ती या लोकल ट्रेनमध्ये गर्दीचा सामना करत आपल्या कामाच्या ठिकाणी पोहचतात. लोकल ट्रेनने प्रवास करताना त्याचे नियम पाळणे देखील गरजेचे असते. मात्र अनेक व्यक्ती नियम न पळता आपल्यामुळे इतरांचा जीवही धोक्यात घालतात.

Viral Video
रणबीर आणि आलियाने डोक्यावर ग्लास ठेवून धरला 'जमाल कुडू' गाण्यावर ठेका, Filmfare Awards मधील VIDEO होतोय व्हायरल

असाच एक खतरनाक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण धावत्या ट्रेनमध्ये दरवाजाला लटकलाय. येथे लटकून बाहेर येणारे खांब आणि विजेचे पोल यांना तो हात लावून स्टंट करून दाखवत आहे. व्हिडियो पाहताना आता या तरुणाला एखादा खांब लागेल आणि तो ट्रेनमधून खाली कोसळेल असं वाटत आहे. काळजात धडकी भरवणारा हा व्हिडिओ येथेच संपत नाही.

आपल्याला एवढं जमतंय तर आपण या पेक्षाही आणखी काही आव्हानात्मक केलं पाहिजे असं त्याला वाटतं. त्याचा स्टंट ट्रेनमधील प्रवास करणारे प्रवासी सुद्धा पाहत आहेत. ट्रेन धावत असतानाच हा तरुण दरवाजाला वरच्या दिशेने लटकतो. येथे लटकून तो ट्रेनच्या छतावर जाण्याचा प्रयत्न करतो. कसं बसं तो ट्रेनच्या छतावर देखील पोहचतो.

नंतर वरती असलेल्या ट्रेनच्या तारा हुकवत तो पुढे जातो. तितक्यात एक तार त्याच्या डोक्याला लागते आणि त्याला जोरात विजेचा शॉक लागतो. शॉक लागल्याने हा तरुण तेथेच पडून राहतो. ही संपूर्ण थरारक घटना एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केली आहे.

कदाचित या तरुणाच्या एका मित्रानेच हा व्हिडिओ रेकॉर्ड केला असावा. आपला स्टंट सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर आपल्याला भरपूर लाइक्स मिळतील आणि आपण व्हायरल होऊ असं त्याला वाटलं असेल. आता हा तरुण व्हायरल तर होतोय मात्र तो या जगात आहे की नाही याबाबत माहिती मिळाली नाही.

@bdr3333g या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नेटकऱ्यांंनी यावर अनेक कमेंट केल्यात. काहींनी यावर हसण्याचे ईमोजी पाठवलेत. तर काहींनी घटनेमागचं गांभीर्य ओळखून प्रतिक्रिया दिली आहे.

Viral Video
Musheer Khan Helicopter Shot: मुशीरचा धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट पाहिलात का? Video होतोय व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com