'तेरे बाप की जगह है क्या! एकमेकींचा बाप काढत ओढल्या झिपऱ्या; अॅमिटी युनिव्हर्सिटीत पोरींचा तुफान राडा |Video Viral
अमिटी युनिव्हर्सिटीतील दोन विद्यार्थिनींच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
शिवीगाळ करत दोन्ही विद्यार्थिनी एकमेकींच्या झिपऱ्या ओढत आहेत.
हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झालाय.
कॉलेज जीवन हे खूप खास असते. नवीन मैत्री, अभ्यास आणि कधीकधी अगदी लहानसहान वाद, यासारख्या गोष्टींमुळे महाविद्यालयीन जीवन रंगतदार बनत असते. परंतु कँलेजमध्ये विद्यार्थ्यांमध्ये हाणामाऱ्या देखील खूप होत असतात. कधी हे वाद इतके मोठे होतात की लोकांचे लक्ष लगेच त्याकडे जाते. असाच एक प्रकार नुकताच नोएडातील अॅमिटी युनिव्हर्सिटीमध्ये घडलाय. येथे दोन मुलींची जबरदस्त हाणामारी झालीय.
दोघीही एकमेकांना आई-बापावरू शिव्या घालत आहेत. एकमेकींचा बाप काढत या दोन्ही पोरींनी झिपऱ्या उपटण्यास सुरुवात केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होतोय. यावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह इतर सामान्य युजर्सही या घटनेवर प्रतिक्रिया देत आहेत. या घटनेचा व्हिडिओ @choga_don नावाच्या अकाउंटने शेअर केला आहे. या व्हिडिओला झपाट्याने व्ह्यूज आणि लाईक्स मिळत आहेत आणि लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. काही जण या संपूर्ण वादाला क्षुल्लक भांडण म्हणून फेटाळून लावत आहेत, तर काही जण तो कॉलेज जीवनाचा एक सामान्य भाग मानत आहेत.
कॅम्पसमध्ये काय घडले?
अॅमिटी युनिव्हर्सिटीमधील दोन विद्यार्थिनी एकमेकांशी भांडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. यातील एका मुलीने दुसऱ्या मुलीला काही प्रश्न विचारले त्यावरून हा वाद सुरू झाला. एका ठिकाणी बसलेल्या एका मुलीला एक मुलगी तिथे का बसलीस असा प्रश्न करते. तिच्या या प्रश्नावर पहिल्या विद्यार्थिनीला राग येतो आणि ती कठोर शब्दात उत्तर देते. बस यानंतर दोघांमधील बाचाबाची थेट हाणामारीत रुपांतरीत होते. या व्हिडिओमध्ये दोन्ही मुली एकमेकांना मारतात. एकमेकांचे केस ओढतात, धक्काबुक्की करतात. काही सेकंदातच गोंधळ इतका तीव्र होतो की जवळचे विद्यार्थीही आश्चर्यचकित होतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

