Viral News : अबब! 9 कोटींना 1 किलो चहापत्ती? गंभीर आजारांवर गुणकारी चहा?

Worlds most expensive tea : जगातील सर्वात महागड्या आणिम दुर्मिळ चहापत्तीची किंमत तुम्ही ऐकलीय का? एका हिऱ्याच्या किंमतीएवढी म्हणजेच चक्क 9 कोटी रुपयांना केवळ एक किलो चहापत्ती मिळतेय. कुठे मिळतोय एव्हढा महाग चहा पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
worlds most expensive tea da hong pao
worlds most expensive tea da hong paox
Published On

सुप्रिम म्हसकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

अनेकांच्या दिवसाची सुरुवात वाफाळलेल्या चहाच्या घोटानं होते. जगभरात चहा शौकिनांची संख्या मोठी आहे. त्यातही अनेक फ्लेवर आलेत. गरीबांपासून ते श्रीमंतापर्यंत सगळ्यांनाच दिवसभरात एकदा तरी चहा हवाच...10 रुपयांपर्यंत मिळणारा चहा गरीबांनाही परवडणारा आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला महागड्या चहाबद्दल सांगणार आहोत. चक्क एका हिऱ्याच्या किंमती एव्हढी चहापत्ती आहे. हजारात नाही, लाखांत नाही तर तब्बल 9 कोटी रुपयांना एक किलो चहापत्ती मिळतेय...आश्चर्य वाटलं ना...पण हे खरं आहे. दूर्मिळ आणि गुणकारी असलेल्या या चहापत्तीतून तयार केलेला एक कप चहा पिण्यासाठी तुम्हाला तब्बल 1 ते 2.5 लाख रुपये खर्च करावे लागतील. त्यामुळे लाखमोलांच्या या चहाचं वैशिष्ट्य काय आहे? ते पाहूयात..

अबब! 9 कोटींची चहापत्ती?

चहा पावडरचं नाव 'दा-होंग-पाओ-टी'

1 किलो चहापत्तीची किंमत 9 कोटी

चीनमधील फुजियानमधील वुईसन भागात चहा उपलब्ध

या चहाची फक्त 6 झाडं असल्यानं दुर्मिळ

हा चहा आरोग्यदायी, गंभीर आजारांवर परिणामकारक

worlds most expensive tea da hong pao
Raj Thackeray : ५ जुलैला विजयी सभा, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; पण सभेला राज ठाकरे उपस्थित राहणार? 'या' दिवशी कोडं उलगडणार

चीनमधील 'दा-होंग-पाओ-टी'ची झाडे दुर्मिळ असल्यानं ती मौल्यवान आहेत. 2006 मध्ये वुहाई शहराच्या सरकारने या सर्व 6 झाडाचा विमा करून घेतलाय. आज या विम्याचं मूल्य 1अब्ज 19 कोटींच्या घरात आहे. आता या चहाच्या झाडांपासून चहाची पाने काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान चीनमध्ये 'दा-होंग-पाओ-टी'ची कृत्रिमरित्या लागवड केली जातेय. म्हणूनच अशा चहाच्या पानांची किंमत इतर चहापेक्षा जास्त आहे. या चहाच्या झाडापासून काढलेली काही पाने बीजिंगच्या पॅलेस संग्रहालयात ठेवण्यात आली होती. ज्यामुळे चीनने जगातील सर्वात महागड्या चहातून टी डिप्लोमसी निर्माण केलीय. तुम्ही चहाचे शौकीन असाल आणि तुम्हाला तब्येत ठणठणीत ठेवायची असेल तर तुम्हाला खिसा बराच खाली करावा लागेल. आणि त्यासाठी थेट चीनची वाट धरावी लागेल.

worlds most expensive tea da hong pao
Maharashtra Politics : ठाकरे बंधूंच्या युतीच्या हालचालींना वेग, दोन बड्या नेत्यांमध्ये गुप्त भेट?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com