Viral Video: नवरा अन् बॉयफ्रेंडसोबत राहायचंय.. ३ लेकरांची आई थेट विजेच्या खांबावर चढली; VIDEO व्हायरल

Women Climb Electric Pole Viral Video: उत्तरप्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यात एका विवाहित महिलेने प्रेम प्रकरण उघडकीस आल्यानंतर टोकाचे पाऊल उचलले. मला नवरा आणि प्रियकरासोबत राहायचं आहे, असे म्हणत ही महिला थेट विजेच्या खांबावर चढली.
Women Climb Electric Pole Viral Video:
Women Climb Electric Pole Viral Video: Saamtv

Uttar Pradesh Viral Video:

उत्तर प्रदेशमधून एक चक्रावून टाकणारी अजब प्रेमाची गजब कहाणी समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यात एका विवाहित महिलेने प्रेम प्रकरण उघडकीस आल्यानंतर टोकाचे पाऊल उचलले. मला नवरा आणि प्रियकरासोबत राहायचं आहे, असे म्हणत ही महिला थेट विजेच्या खांबावर चढली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गोरखपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहित महिलेचे प्रेमप्रकरण उघड झाल्यानंतर महिलेने टोकाचे पाऊल उचलत ती थेट विजेच्या खांबावर चढली. या महिलेला तीन मुले असून तिचे गेल्या सात वर्षांपासून शेजारच्याच गावातील तरुणाशी प्रेमसंबंध होते. हा प्रकार तिच्या पतीला समजताच त्याने तिला विरोध करण्यास सुरुवात केली. यानंतर महिलेने त्याला आत्महत्येची धमकी देण्यास सुरुवात केली.

मला पती आणि प्रियकरासोबत राहायचे आहे अशी मागणी करत महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले. महिनाभरापूर्वी या महिलेने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तसेच याआधीही महिलेने रेल्वे रुळावर येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Women Climb Electric Pole Viral Video:
Rashmi Barve : काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना मोठा धक्का; कोर्टाकडून जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्याप्रकरणी दिलासा नाही

सध्या या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ही महिला हाय-टेन्शन इलेक्ट्रिक वायरला बांधलेल्या विजेच्या खांबावर चढताना दिसत आहे. गावातील लोक आणि पती या महिलेला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र महिला काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही.

दरम्यान, महिला विद्युत खांबावर चढल्याची माहिती मिळताच पोलीस व विद्युत विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी महिलेला त्वरीत शांत करून खांबावरून खाली आणले. सध्या महिला सुखरूप आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

Women Climb Electric Pole Viral Video:
Ambarnath News: हृदयद्रावक घटना! पाण्याची टाकी साफ करताना विजेचा धक्का; ३ कामगारांचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com