Why Cricket Bats are Wooden: क्रिकेटची बॅट लाकडाची का असते? स्टीलची का नाही? काय आहे नेमकं कारण

Why Cricket Bats are Wooden: क्रिकेटमध्ये लाकडाची बॅट का असते? स्टील, प्लास्टिक आणि अन्य धातूच्या बॅट का नसतात? असे प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत असतील.
Why Cricket Bats are Wooden
Why Cricket Bats are WoodenSaam tv
Published On

Why Cricket Bats are Wooden:

विश्वचषक स्पर्धेमुळे भारतातील वातावरण क्रिकेटमय झालं आहे. टीम इंडियाच्या धमाकेदार कामगिरीमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. भारताचे फलंदाज आणि गोलंदाज असे दोन्हीही चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. याच क्रिकेटमध्ये लाकडाची बॅट का असते? स्टील, प्लास्टिक आणि अन्य धातूच्या बॅट का नसतात? असे प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत असतील. असे प्रश्न उपस्थित होत असेल तर तुम्ही एकटे नाहीत. (Latest Marathi News)

सोशल मीडियावर काही नेटकरी प्रश्न करत असतात.'क्रिकेटमध्ये लाकडाची बॅट का असते? असा एक प्रश्न काही वर्षांपूर्वी नेटकऱ्याने क्वॉरावर प्रश्न केला होता.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Why Cricket Bats are Wooden
Kathak Dance Video: धावत्या दुचाकीवर मुलीनं केलं कथ्थक; स्टेप्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल, VIDEO व्हायरल

अनिमेष कुमार सिन्हा नावाच्या व्यक्तीने म्हटलं की, 'क्रिकेटमध्ये लाकडाच्या बॅटचा वापर करणे गरजेचे असते. मात्र, लाकडी बॅट वापरण्याबाबत याआधी काही नियम नव्हते. एका सामन्यात डेनिस लिली मित्राच्या कंपनीची अ‍ॅल्यूमिनियम बॅट प्रमोट करण्यासाठी खेळायला घेऊन आला होता. हा प्रकार १४ डिसेंबर,१९७९ साली इंग्लंडमध्ये झाला होता. यानंतर लाकडी बॅट सोडून इतर कोणत्याही धातूची बॅट खेळण्यास मज्जाव करण्यात आला आहे. बॅटचं बॉटम आणि हँडल लाकडाचं असलं पाहिजे'.

Why Cricket Bats are Wooden
Girls Fight Viral Video: तरुणीची प्रेमासाठी 'दे दणादण'! कॉलेजच्या क्लासरुमध्ये दोघी भिडल्या.. VIDEO तूफान व्हायरल

क्रिकेटच्या बॅटचा काय नियम आहे?

लॉर्ड्सच्या वेबसाइटनुसार, बॅटचं दोन भागात विभाजन केलं जातं. हँडल आणि बॉटम या दोन भागात वर्गीकरण केलं जातं. हँडलला पकडून क्रिकेटर फलंदाजी करतात. बॉटमचा (ब्लेड) वापर करून फटकेबाजी करतात. हे दोन्ही भाग लाकडी असले पाहिजे, असा नियम आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com