Viral Video : वऱ्हाड निघालं रेल्वेनं! लग्नाचा थाट असा की थेट ट्रेनचा कोच बुक केला, डान्स-गाणी अन् बरंच काही....; VIDEO व्हायरल

Railway Wedding Viral Video : लग्नासाठी संपूर्ण ट्रेन कोच बुक करून वऱ्हाडाने केलेला जल्लोष सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. डान्स, गाणी आणि सेलिब्रेशनने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
Viral Video : वऱ्हाड निघालं रेल्वेनं! लग्नाचा थाट असा की थेट ट्रेनचा कोच बुक केला, डान्स-गाणी अन् बरंच काही....; VIDEO व्हायरल
Railway Wedding Viral VideoSaam Tv
Published On
Summary
  • लग्नासाठी संपूर्ण ट्रेन कोच बुक करण्यात आला

  • ट्रेनमध्येच डान्स, गाणी आणि केक कटिंग

  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • लोकांकडून मिश्र प्रतिक्रिया

भारतीय लग्नसमारंभांची भव्यता आणि थाटमाट जगभर प्रसिद्ध आहे. लग्न हा प्रेत्येकाच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. तो साजरा करण्यासाठी अनेक जण वेगवगेळे नियोजन करतात. मात्र एका कुटुंबाने लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाण्यासाठी पूर्ण कोच बुक केल्याचे पाहायला मिळते आहे. या कोचमध्ये वधूच्या कुटुंबीयांनी गाणी, डान्स, जल्लोषाने संपूर्ण कोचमध्ये धिंगाणा घातला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, सुरुवातीला एक माणूस रेल्वेला फुलांचा हार बांधतो आहे. त्यानंतर प्लॅटफॉर्मवर वधूचं कुटुंब डान्स करताना पाहायला मिळत आहे. परिवारातील लहान मुले, तरुण आणि आजी आजोबा आनंद लुटताना दिसत आहेत.

Viral Video : वऱ्हाड निघालं रेल्वेनं! लग्नाचा थाट असा की थेट ट्रेनचा कोच बुक केला, डान्स-गाणी अन् बरंच काही....; VIDEO व्हायरल
Shocking : केबिनचा दरवाजा लावला,कपडे काढायला सांगितले अन्... उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत डॉक्टरचे अश्लील कृत्य

काही जण नाचत आहेत, तर काही जण संगीताच्या तालावर टाळ्या वाजवत आहेत. तसेच या आनंदच्या प्रसंगी होणाऱ्या नवरीच्या केक कापला आणि पुढच्या प्रवासाला निघाले. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अनेक वापरकर्त्यांनी या अनोख्या सेलिब्रेशनचं कौतुक केले. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, लग्नासाठी संपूर्ण कुटुंबासोबत ट्रेनने प्रवास करणे हा एक मजेशीर अनुभव आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले की, जुने दिवस आठवले. तर काहींनी सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गोंगाटाबद्दल नाराजीही व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com