Fact Check : तुम्ही पाणीपुरी खाताय की तेलपुरी? पाणीपुरीच्या एका पुरीत एवढं तेल? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Fact Check PaniPuri Video : तुम्ही पाणीपुरी खात असाल तर हा व्हिडिओ नक्की पाहा. व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल की आपण पाणीपुरी खातोय की तेलपुरी. म्हणूनच आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.
Fact check
Fact checkSaam Tv (Youtube)
Published On

Fact Check Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पाणीपुरी खाण्याची कुणाची हिंमत होणार नाही. कारण, पुरीला फुंक मारल्यानंतर यातून 5 ते 6 थेंब तेल बाहेर येत असल्याचं दिसतंय. खरंच एवढ्या मोठ्या प्रमाणात एका पुरीत तेल असतं का? बरेच जण पाणीपुरी आवडीने खातात. हा आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

एका पाणीपुरीत 4 ते 5 थेंब तेल असल्याचा दावा करणारा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. कारण, जास्त प्रमाणात तेल खाणंही आरोग्यासाठी चांगलं नाही. पाणीपुरी सगळेच आवडीने खातात. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. पाणीपुरीच्या पुरीत किती तेल असतं हे पाणीपुरीच्या ठेल्यावरच कळू शकतं. कारण, लोक तिथूनच पाणीपुरी खातात. म्हणून आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे पाणीपुरीच्या ठेल्यावर पोहोचले. आणि खरंच पाणीपुरीत जास्त तेल असतं का हे जाणून घेतलं.

व्हायरल व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे प्रत्यक्षात पाहिल्यावर पुरीत इतकं तेल दिसलं नाही...मात्र, पाणीपुरीत किती प्रमाणात तेलं असतं आणि तेल किती प्रमाणात खावं. याची माहिती डॉक्टर देऊ शकतात. त्यामुळे आम्ही डॉक्टरांचाही सल्ला घेतला. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

Fact check
Pune GBS Update : जीबीएसचा धोका वाढला, पुण्यात आणखी ४ नवे रुग्ण; एकूण २० जण व्हेंटिलेटरवर

आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे काय म्हणाले?

- सगळ्याच पुऱ्या या खाण्यास हानिकारक नाहीत

- पुरी कुठे आणि कुठल्या तेलापासून बनवली महत्त्वाचं

- व्हायरल व्हिडिओतील पुरी खराब तेलातील असावी

- पाणीपुरी खाताना स्वच्छ ठिकाणी खावी

- दिवसाला 10 एमएल तेल आरोग्यासाठी घातक नाही

Fact check
Beed Politics : 'देवेंद्र बाहुबली, पंकजा शिवगामी', पंकजा-धसांमध्ये स्टेजवरच कलगितुरा; VIDEO

त्यामुळे सगळ्याच पाणीपुरीतील पुरीत जास्त प्रमाणात तेल असतं हा दावा असत्य ठरलाय. तरीदेखील तुम्ही पाणीपुरी खाताना चांगल्याच ठेल्यावर खा. अस्वच्छ ठिकाणी कोणतेही पदार्थ खाऊ नका.

Fact check
Udayanraje Bhosale : 'राहुल सोलापूरकरला गोळ्या घाला', छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान, उदयनराजेंचा संताप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com