सध्या लहानांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाला स्ट्रीट फूड खाणे आवडते. त्यातल्या त्यात भारतात चाइनीज फूड जास्त पंसत केले जाते. भूक लागताच सर्वात पहिले नूडल्सच्या दुकानावर पटकन नजर जाते. चटपटीत आणि स्पाइसी नुडल्स सर्वांना आवडतात. अशातच सोशल मीडियावर चाइनीज बनवण्यासाठी लागणारे नूडल्सना नदीच्या पाण्यात साफ करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्याला बघून प्रत्येकजण हैराण होईल तसंच पुढच्यावेळी चाइनीज खातानाहा व्हायरल व्हिडिओ आठवेल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नूडल्स साफ करण्याची नवीन पद्धत...
व्हायरल व्हिडिओत आपल्याला दिसते की, एक व्यक्ती नदीच्या काठावर मोठी बास्केट हातात पकडून उभा आहे. त्या बास्केटमध्ये आपल्याला नूडल्स दिसत आहेत. त्यानंतर तो हातात असलेली प्लॉस्टिकची बास्केट नदीच्या पाण्यात टाकून नूडल्स साफ करतोय. दोनवेळा नूडल्स धुतल्यानंतर तो बास्केट घेऊन तिथून निघून जातो.
व्हायरल व्हिडिओ___mr.mishra_je_या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिल आहे की,कुकुरघाटवा मेला और खाओ मेले मे चौमिन. व्हायरल व्हिडिओ नेमका कुठला आहे समजू शकले नाही. कुकुरघाट यात्रेतील एका व्यक्तीने हा किळसवाणा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की,'जणू त्याला या नूडल्स गंगेत विसर्जित करून शुद्ध करायचे आहे. व्हायरल व्हिडिओ लाखोंच्या घरात बघितला गेला आहे. व्हिडिओवर काहींनी गमतीदार प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काहींनी अशा प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.