Viral Snake Video: तडफडला, कोसळला, पण... महाकाय अजगराने वृद्धाच्या गळ्याला घट्ट विळखा घातला अन्; थरकाप उडवणारा VIDEO
Shoking Viral Video News: सोशल मीडियावर आपल्याला एका पेक्षा एक भयंकर व्हिडिओ पाहायला मिळतात. जे पाहून अनेकांची भितीने गाळण उडते. सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. व्हिडिओमध्ये एका भल्यामोठ्या अजगराने वृद्ध व्यक्तीच्या गळ्याला विळखा घातल्याचे दिसत असून सर्वजण त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत... (Viral Video News in Marathi)
जगभरात सापांच्या (Snakes) अनेक प्रजाती आहेत. ज्यामधील काही साप इतके भयंकर आणि विषारी आहेत की त्याने दंश केल्यास जीव वाचणे अशक्यच असते. अशा महा भयंकर सापांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, जे पाहून भल्याभल्यांची भितीने गाळण उडते.
सध्या एका महाकाय अजगराचा एक व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका मोठ्या अजगराने वृद्ध व्यक्तीच्या डोक्याला, मानेला विळखा घातल्याचे दिसत आहे. अजगराचा हा विळखा इतका घट्ट आहे की वृद्धाला गुदमरल्यासारखे होत आहे.
इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये (Video) तुम्ही पाहू शकता की, एका कोरड्या कालव्यात वृद्ध व्यक्तीच्या मानेला महाकाय अजगराने विळखा घातला आहे. त्या वृद्धासह दोन तरुण सापाला सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सापाचा विखळा इतका मजबूत आहे की वृद्धाला श्वास घेण्यासही त्रास होत आहे.
हा अजगर जसा आपला फास आवळतो तसा हा वृद्ध तिथेच जमीनीवर पडतो. अनेकदा प्रयत्न करुनही हा अजगर या व्यक्तीला सोडत नाही. दोन तरुण त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र हा महाकाय अजगर त्यांनाही आवरत नसल्याचे दिसत आहे.
या वृद्ध व्यक्तीचे पुढे काय झाले.. याबद्दलची माहिती मिळू शकली नाही, मात्र या व्हिडिओने सर्वांचीच भितीने गाळण उडाली आहे. अनेकांनी अशा सापांपासून काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे तर काही जणांनी हा सर्वात भयंकर व्हिडिओ असल्याचे सांगितले आहे. तसेच काही जणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वृद्धाला मदत करणाऱ्या तरुणांचे कौतुकही केले आहे. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.