Viral Video: गर्लफ्रेंडला इंप्रेस करायला सिंहाच्या पिंजऱ्यात घुसला, नंतर गायबच झाला; पाहा थरारक व्हिडीओ

Lion Attack Video: प्राणी संग्रहालयातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पिंजऱ्यातील तीन सिंहांनी व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीवर हल्ला केल्याचे दिसते.
Lion attack on zookeeper
Lion attack on zookeeperX (Twitter)
Published On

Viral Video: आपल्या प्रियकराला, प्रेयसीला इंप्रेस करण्यासाठी आजकाल लोक काहीही करतात. सोशल मीडियावर अशा प्रेमात वेडे झालेल्या लोकांचे असंख्य व्हिडीओ पाहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एकाने आपल्या गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी सिंहांच्या पिंजऱ्याचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. पिंजऱ्यातील वाघांनी त्या व्यक्तीवर हल्ला केला आणि त्यात त्याने आपला जीव गमावला.

द मिरर यूएसने दिलेल्या माहितीनुसार, सिंहांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव एफ. इरिस्कुलोव असे आहे. ४४ वर्षीय इरिस्कुलोव हा उझबेकिस्तानच्या पार्केंटमधील एका खासगी प्राणीसंग्रहालयामध्ये काम करत असे. संग्रहालयातील प्राण्यांची देखभाल करण्याचे काम त्याच्याकडे होते. पहाटे ५ च्या सुमारास तो सिंहांच्या पिंजऱ्याजवळ गेला. पिंजऱ्याचे दार उघडत तो आत गेल्यानंतर क्षणार्धात तीन सिंहांनी त्याच्यावर हल्ला केला. हा थरारक प्रसंग त्याच्या फोनच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला.

इरिस्कुलोव आपल्या गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी सिंहांच्या पिंजऱ्यात घुसला. सुरुवातीला सिंह शांत होते, पण काही सेकंदांमध्ये एका सिंहाने इरिस्कुलोववर हल्ला केला. 'सिंबा' असे ओरडत त्याने हल्ला करणाऱ्या सिंहाला शांत करण्याचा प्रयत्न केला. पुढे बाकीच्या सिंहांनीही इरिस्कुलोववर झडप मारली. या भयानक हल्ल्यामध्ये इरिस्कुलोवचा मृत्यू झाला. व्हिडीओमध्ये पिंजऱ्यामध्ये प्रवेश केल्यापासून ते सिंहांनी हल्ला केल्यापर्यंतचे दृश्य पाहायला मिळते.

Lion attack on zookeeper
Melanistic Leopard: काळा बिबट्या कधी पाहिला का? VIDEO होतोय व्हायरल

स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहचत घटनेचा तपास केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उझबेकिस्तानच्या पार्केंटमधील लायन पार्क प्रायव्हेड झू या प्राणीसंग्रहालयात ही घटना घडली आहे. तीन सिंह असलेल्या पिंजऱ्यामध्ये संग्रहालयात काम करणाऱ्या इरिस्कुलोवने प्रवेश केला. तीनपैकी एका सिंहाने त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर बाकीच्या दोन्ही सिंहांनीही त्याच्यावर झडप मारली. या भयानक हल्ल्यांमध्ये झालेल्या जखमांमुळे ४४ वर्षीय इरिस्कुलोवने जीव गमावला.

Lion attack on zookeeper
Knief In Pizza: पिझ्झामध्ये चाकूचा तुकडा, पिंपरी-चिंचवडमधील व्हिडिओने खळबळ; VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com