Viral Video: हृदयस्पर्शी! अमेरिकेत भारतीय जेवण पाहिलं... चिमुरडीचा आनंद गगनात मावेना; दत्तक मुलीचा सुंदर व्हिडिओ

Girl See Indian Food In America: मुलगी अपंग आहे. तिला बोलता येत नाही, ऐकू येत नाही मात्र तिने व्यक्त केलेला आनंद अगदी भावूक करणारा आहे.
 Girl See Indian Food In America
Girl See Indian Food In AmericaSaamtv

Heart Torching Video: सोशल मीडिया असंख्य व्हिडिओंचा खजाना आहे. सोशल मीडियावर एकापेक्षा एक भन्नाट व्हिडिओ पाहायला मिळतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला पोटधरुन हसायला लावतात, तर कधी भावनिकही करतात.

सध्या अशाच एका चिमुकलीच्या व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. व्हिडिओमधील मुलीला एका अमेरिकन कुटूंबाने दत्तक घेतले असून अमेरिकेत तिला भारतीय जेवण मिळाल्यानंतर तिला झालेला आनंद यामध्ये पाहायला मिळत आहे.

 Girl See Indian Food In America
Praniti Shinde Banner: प्रणिती शिंदेचे भावी खासदार म्हणून सोलापुरात झळकले बॅनर; प्रणितीने व्यक्त केली नाराजी

काय आहे व्हिडिओ...

व्हिडिओमध्ये (Video) एक अमेरिकन कुटूंब दत्तक मुलीला घेवून एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये गेल्याचे दिसत आहे. ज्यावेळी ते त्या रेस्टॉरंटमध्ये जातात तिथे भारतीय खाद्यपदार्थांनी भरलेले एक ताठ मुलीसमोर येते. हे पदार्थ पाहून मुलगी प्रचंड आनंदी होते. कदाचित अमेरिकेत आल्यापासून तिने भारतीय जेवण खाल्ले नसावे, म्हणूनच ही मुलगी आनंदाने, आश्चर्याने असा काही आनंद व्यक्त करती जे पाहून तुम्हीही भावूक व्हाल...

दत्तक मुलीने परदेशात पाहिले भारतीय पदार्थ..

बाहेर गेल्यानंतर आपल्या घरच्या जेवणाची, आपल्या आवडीच्या पदार्थांची किंमत काय असते.. हेच या व्हिडिओमधून दिसत आहे. व्हिडिओमधील मुलगी अपंग आहे. तिला बोलता येत नाही, ऐकू येत नाही मात्र तिच्या एक्सप्रेशनमधून तिने व्यक्त केलेला आनंद अगदी भावूक करणारा आहे.

 Girl See Indian Food In America
Solapur Political News : सोलापुरात भाजपला मोठं खिंडार; पदाधिकारी सामूहिक राजीनामे देत बीआरएसमध्ये प्रवेश करणार

नेटकरीही भावूक...

मुलीच्या पालकांनी याबद्दल बोलताना आम्ही तिला भारतामधून (India) दत्तक घेतले असल्याचे सांगितले. तसेच आमच्या घरात फारशे भारतीय पदार्थ बनवत नाही. पहिल्यांदाच तिला इतके भारतीय पदार्थ दिसले, ज्यामुळे तिला आनंद झाल्याचे ते म्हणाले. या व्हायरल व्हिडिओवर (Viral Video) नेटकऱ्यांनीही भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अनेकांनी आपल्या भारतीय पदार्थांचे कौतुक केले आहे. तर काही जणांनी छोट्या छोट्या गोष्टीत किती आनंद असतो.. अशी भावूक प्रतिक्रिया दिली आहे.  हा व्हिडिओ लॅडबिबल या परदेशी वेबसाइटने शेअर केला आहे. जो आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com