Viral Video : १४ व्या मजल्यावरुन उडी मारणार होता, दोन जणांनी वाचवला जीव, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

Viral Video : नोएडामधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. दोन तरुणामुळे त्याचा जीव वाचलाय.
Delhi Viral Video
Delhi Viral VideoViral Video
Published On

Supertech Viral Video : १४ व्या मजल्यावरुन उडी घेणाऱ्या तरुणाला दोन जणांनी वाचवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील असल्याचे समजतेय. सुपरटेक केपटाऊन सोसायटीमधील इमारतीच्या १४ व्या मजल्यावरुन एकाने उडी घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केला. पण दोन तरुणांनी अतिशय चपळाईने त्याचा जीव वाचवला. या घटनेचा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झालाय. हा व्हिडीओ समोरच्या इमारतीवरुन काढलेले दिसत आहे.

नोएडामधील सूपरटेक केपटाउनमधील व्हिडीओ व्हायरल

मीडिया रिपोर्ट्सनुसार १४ व्या मजल्यावरुन उडी घेणारा तरुण मानसिक आजाराने त्रस्त आहे. ज्यावेळी तरुण १४ व्या मजल्यावरुन उडी घेत होता, त्यावेळी खाली राहणाऱ्या तरुणांनी पाहिले. त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ पायऱ्यावरुन धाव घेत वाचवले. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नोएडामधील सेक्टर ७४ मध्ये असणाऱ्या सूपरटेक केपटाउनमध्ये ही घटना घडली.

व्हिडीओत नेमकं काय आहे?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत तरुण 14व्या मजल्यावरील बाल्कनीतून हाताने लटकत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर इमारतीमध्ये एकच गोंधळ सुरु झाला. या आवाजानंतर खालील मजल्यावरच्या दोन लोकांनी प्रसंगावधान राखत पायऱ्यांवरून धावत आले. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मागून दोन लोक येतात आणि त्याला खेचून सुरक्षित स्थळी नेतात. त्या दोन जणांमुळे दुर्देवी घटना टळली.

व्हायरल होणारा व्हिडीओ पाहा

पोलिसांनी काय सांगितले ?

सुपरटेक केपटाऊन सोसायटीमधील या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. मिडिया रिपोर्ट्सनुसार, १४ व्या मजल्यावरुन उडी घेणारा तरुण मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो व्यक्ती आधी नोएडा सेक्टर ४१ मध्ये राहत होता. तो नुकताच आपल्या कुटुंबासोबत सुपरटेक केपटाऊन सोसायटीत शिफ्ट झालाय, असेही पोलिसांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com