Viral News: अंगावर सोन्याचे दागिने घालत असाल तर तुम्ही निरोगी राहाल? व्हायरल मेसेजचा दावा काय

Gold Jewelry Keep Healthy: सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. यात गजब दावा करण्यात आलाय. अंगावर सोने परिधान केल्याने आरोग्य चांगले राहते, असा दावा करण्यात आलाय.
Gold Jewelry
Gold Jewelry Keep Healthysaam tv
Published On

तुम्हाला सोनं आवडतं का? तुम्हाला सोनं आवडत असेल तर ते परिधान करा कारण, त्यामुळे आपल्या आरोग्यास फायदे होतात असा दावा करणारा मेसेज व्हायरल करण्यात आलाय...मात्र, हा दावा खरा आहे का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं. पाहुयात.

तुम्ही सोनं घालता का?

अंगावर सोन्याचे दागिने घालत असाल तर तुम्ही निरोगी राहाल.हे आम्ही म्हणत नाहीये.तर सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे मेसेज पाहा.सोनं अंगावर घातल्याने शरीर हेल्दी राहतं. सोनं चांगलं असतं असा दावा करण्यात आलाय पण, या दाव्यात तथ्य आहे का?

Gold Jewelry
Pune Video: बसमध्ये छेड काढणाऱ्याला महिलेने शिकवला धडा; सपासप २५ चापटा मारल्या; पुण्यातील VIDEO व्हायरल

मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

सोनं घातल्याने आरोग्य सुधारतं आणि शरीर शुद्ध होते. सोन्यामुळे शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो आणि नसा, स्नायू, तसेच मेंदूवरही चांगले परिणाम होतात. याच मेसेजची आम्ही पडताळणी करणार आहोत, त्यासाठी तुम्ही पुढील 3 मिनिटं ही बातमी पूर्ण पाहा.

व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

सोनं हे कुणाला नको असतं. सगळ्यांनाच सोनं आवडतं. मात्र, आता सोन्याचे वाढते दर पाहता सगळ्यांनाच परवडत नाही पण, खरंच सोनं घातल्याने आरोग्य हेल्दी राहतं का? सोन्यामध्ये असं काय असतं त्यामुळे थेट आरोग्यावर फायदे होतात? याची माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. कारण, अनेकांना दागिने अंगावर घालायला आवडतात. महिला तर कार्यक्रमांमध्ये दागिने नसतील तर जातही नाहीत. त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने तज्ज्ञांचा सल्ला घेतला.

Gold Jewelry
Viral Video: कॅनॉलवर पोरा-पोरींची स्टंटबाजी; थरारक VIDEO पाहून सर्वांनाच धक्का!

व्हायरल सत्य /साम इन्व्हिस्टिगेशन

मेडिकल सायन्स स्टडीजमध्ये अद्याप हे सिद्ध करणारं संशोधन नाही

सोनं अंगावर घातल्याने शरीर शुद्ध होतं, यात तथ्य नाही

सौंदर्य वाढीसाठी दागिन्यांचा वापर होतो, आरोग्यासाठी नाही

सकस आहार, व्यायाम, पुरेशा झोपेमुळे आरोग्य निरोगी राहतं

आयुर्वेदामध्ये सुवर्ण भस्म खाण्याचे फायदे सांगण्यात आलेत.

त्यामुळे आमच्या पडताळणीत सोनं परिधान केल्याने आरोग्याला फायदा होतो हा दावा असत्य ठरलाय. हे अजून वैज्ञानिक दृष्टीकोनातून सिद्ध झालेलं नाही.आयुर्वैदात हे आरोग्यास चांगलं असल्याचं सांगितलं असलं तरीदेखील संशोधनातून सिद्ध झालेलं नाही.त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी सकस आहार आणि व्यायाम करा. अशा व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नका..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com