Ganesh Mandap: गणेश मंडपात पुजाऱ्यासोबत चमत्कार? बेशुद्ध पडलेला पुजारी थेट उठून बसला?

Fact Check: गणेश मंडपातील एक व्हिडिओ व्हायरल होतोय...या व्हिडिओ पुजाऱ्यासोबत चमत्कार झाल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच गणपतीने पुजाऱ्याला जीवदान दिलंय का...? या व्हिडिओची आम्ही पडताळणी केली...
Priest collapsing in Ganesh Mandap during puja; viral video claimed a miracle, but investigation shows it was scripted for social media.
Priest collapsing in Ganesh Mandap during puja; viral video claimed a miracle, but investigation shows it was scripted for social media.Saam Tv
Published On

गणेश मंडपात बेशुद्ध होऊन पडलेला पुजारी गणपतीमुळे पुन्हा उठून बसल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल झालाय...या व्हिडिओ पुजारी खाली पडताना दिसतोय...आणि त्यानंतर गणपतीजवळील झेंडा पुजाऱ्यावर पडल्यानंतर तो उठून बसतोय...हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून, हा चमत्कार असल्याचा दावा करण्यात आलाय...

सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने हा व्हिडिओ व्हायरल होतोय...काहींनी हा चमत्कार असल्याचं म्हटलंय...त्यामुळे या व्हिडिओमागचं सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केला...हा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहा...हा पुजारी गणेश पुजा करत असताना अचानक छातीत दुखत असल्याचं दिसतंय...त्यानंतर हा पुजारी खाली पडतो...यावेळी आजूबाजूला कुणीही नसतं...त्याचदरम्यान गणपतीजवळचा झेंडा पुजाऱ्याच्या अंगावर पडतो आणि पुजारी उठून बसतो...हा झेंडा गणपतीनेच पाडल्याचा दावा करून हा चमत्कार असल्याचं म्हटलं जातंय...मात्र, या व्हिडिओची आम्ही सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी केली...हा व्हिडिओ निरखून पाहिला

गणेश मंडपात पुजाऱ्यासोबत चमत्कार झालेला नाही

गणपतीजवळील झेंडा एका व्यक्तीने खाली पाडला

गणेश मंडपातील व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे

डिस्क्लेमर काढून टाकून व्हिडिओ व्हायरल केला

सामाजिक संदेश देण्यासाठी व्हिडिओ बनवण्यात आला

काहींनी खोडसाळपणा करण्यासाठी फक्त थोडासाच व्हिडिओ व्हायरल करून चमत्कार असल्याचा दावा केला...मात्र, हा चमत्कार नसून, अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न आहे...त्यामुळे असे व्हिडिओ पाहून विश्वास ठेवू नका...हा व्हिडिओ सोशल मीडियासाठी बनवण्यात आला...मात्र, व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल केलीय...त्यामुळे गणेश मंडपात चमत्कार झाल्याचा दावा असत्य ठरलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com