Experts clarify that eggs do not cause cancer; viral claim proven false after investigation.
Experts clarify that eggs do not cause cancer; viral claim proven false after investigation.Saam Tv

अंडे खाणार, कॅन्सर होणार? अंड्यांमध्ये बंदी असलेलं घातक रसायन?

Viral Egg Cancer Claim Busted: तुम्ही जर अंडी खात असाल तर हे ऐकूनच तुम्हाला धक्का बसला असेल...अंड्यांमध्ये घातक असे रसायन असल्याचा दावा करण्यात आलाय...यामुळे अंडी खाल्ल्याने कॅन्सर होऊ शकतो, असा दावा केला...यामुळे एकच खळबळ उडालीय...पण, खरंच अंडी खाल्ल्याने एवढा भयंकर आजार होऊ शकतो का...?
Published on

व्हिडिओतील डॉक्टर व्होरा यांनी दावा केलाय की EGGOZ या ब्रँडच्या अंड्यांमध्ये नायट्रोफुरन आणि नायट्रोइमिडाझोलसारखे बंदी घातलेले रसायन आढळलेयत...तर यासोबत ट्रस्टिफाईड कंपनीनेही लॅब टेस्ट केली...यामध्ये या EGGOZ ब्रँडमध्ये घातक रसायन आढळल्याचा दावा केलाय...

या घातक रसायनामुळे कॅन्सर होऊ शकतो असा दावा केल्याने याची सत्यता करणं गरजेचं आहे...कारण, लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत बरेचजण अंडी खातात...अंड्यांमध्ये प्रोटीन्स असल्याने खाल्ली जातात...पण, असा दावा केल्यानं आमच्या टीमने पडताळणी सुरू केली...ज्या कंपनीबाबत दावा केलाय त्या कंपनीकडूनही माहिती मिळवली...

EGGOZ कंपनीचं स्पष्टीकरण

आमची अंडी खाण्यासाठी सुरक्षित आणि ती FSSAIने ठरवलेल्या मानकांचं पालन करतो

तरीदेखील या दाव्याबद्दल आम्ही तज्ज्ञांकडून अधिक माहिती मिळवली...

अंडी खाल्ल्याने कॅन्सर होत नाही

अंड्यांमुळे शरीराला प्रोटीन्स मिळतं

अंड्यांमध्ये अमिनो अॅसिड योग्य प्रमाणात असतात

काही कंपन्या पोल्ट्रीत इंजेक्शन, औषधं वापरतात

सर्वच अंडी खाण्यासाठी घातक नाहीत...अंडी ही पौष्टीक असतात...त्यामुळे आमच्या पडताळणीत अंडी खाल्ल्यामुळे कॅन्सर होऊ शकतो हा दावा असत्य ठरलाय...संजय गडदेसह ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही मुंबई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com