
नवी दिल्ली : तुर्कीच्या सैन्य दलाच्या दोन हेलीकॉप्टरची आकाशात समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली आहे. या हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ५ जण हे एकाच हेलिकॉप्टरमधील होते. तर दुसऱ्या हेलिकॉप्टरची सुरक्षित जागेवर लँडिंग करण्यात आली आहे. तर या अपघातातील एका जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तुर्कीचे सुरक्षा मंत्र्यांनी सांगितलं की, 'या भीषण अपघातात ५ सैन्यदलातील जवानांचा मृत्यू झाला आहे. तर एकावर उपचार सुरु आहेत. रिपोर्टनुसार, यूएच-१ हेलिकॉप्टर ट्रेनिंगदरम्यान एकमेकांना धडकलं. सोशल मीडियावर या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये डोंगराळ भागात धुरांचे ढग पाहायला मिळत आहे. तसेच फायरब्रिगेडच्या वाहनाच्या माध्यमातून आग विझविण्याचा प्रयत्न सुरु आहे.
रिपोर्टनुसार, तुर्कीच्या इस्पार्टा प्रांतात केसीबोरलू जिल्ह्यात सेना हेलिकॉप्टरचा क्रॅश होऊन ६ सैनिकांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १ सैनिकही गंभीर जखमी झाला आहे. या सैनिकाने रुग्णालयात उपचारादरम्यान जीव सोडला. या सैनिकांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. दोन्ही हेलिकॉप्टरची धडक नेमकी कशी झाली, याची माहिती समोर आली आहे. या अपघातात एका हेलिकॉरप्टरचं व्यवस्थित लँडिग झालं.
दरम्यान, महाराष्ट्रातील पुण्यातही काही दिवसांपूर्वी हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. या हेलिकॉप्टरच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला होता. या अपघघातात २ पायलट आणि एका इंजिनिअरचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबर महिन्यातील २ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे सात वाजता ही घटना घडली होती. अपघातानंतर अग्निशमन दलाचं पथकाने तातडीने धाव घेतली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.